Nagpur : नागपूरात चितेला अग्नी देताना भडका उडून तिघेजण भाजले, दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू

सरणावरील पेटत्या लाकडाचा उडालेला निखारा डीझेलच्या डबकीवर पडल्याने भडाका उडाल्याची माहिती मिळाली.

Nagpur : नागपूरात चितेला अग्नी देताना भडका उडून तिघेजण भाजले, दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू
नागपूरात चितेला अग्नी देताना भडका उडून तिघेजण भाजले, तिघांवरती रुग्णालयात उपचार सुरुImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 10:59 AM

नागपूर – गावाकडं एखाद्या इसमाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्याचं काम हे भावकीतल्या किंवा गावातल्या लोकांना करावं लागतं. तसेच प्रत्येक समाजाचे रितीरिवाज वेगवेगळे आहेत. त्याचप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सध्या पावसाचे दिवस असल्याने गावकऱ्यांना एखाद्या पार्थिवाला अग्नी देत असताना अधिक काळजी घ्यावी लागते. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कामठीच्या राणी तलाव मोक्षधम मध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. त्यामध्ये चितेला अग्नी देताना भडका उडून तिघेजण भाजले आहेत. सरणावरील पेटत्या लाकडाचा उडालेला निखारा डीझेलच्या (Diesel) डबकीवर पडल्याने भडाका उडाल्याची माहिती मिळाली. भाजलेल्या लोकांवरती रुग्णालयात उपचार (Hospital treatment) सुरु होते.  त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अंत्यविधी दरम्यान दुर्घटना घडली

मिळालेल्या माहितीनुसार, नागसेन नगर येथील रहिवासी सिद्धार्थ अंतुजी हुमने या इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याने गुरुवारला दुपारी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी उरकण्यात येत असताना या कार्यक्रमा दरम्यान मृतकाला अग्नी देत असताना टेंबा लावून डिझेलचा भडका उडाल्याने कार्यक्रमात सहभागी झालेले सुधीर महादेव डोंगरे (45), सुधाकर बुधाजी खोब्रागडे (60) दोघेही राहणार नागसेन नगर कामठी व दिलीप घनश्याम गजभिये (60) रा. न्यू खलाशी लाईन कामठी तिघे जण भाजल्याने गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नेमकं काय झालं

कामठीच्या राणी तलाव मोक्षधम येथील ही घटना आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. एखाद्या व्यक्तीचा गावाकडे असताना मृत्यू झाल्यानंतर त्याला अग्नी देण्याचं काम तिथल्या भावकीकडं किंवा ग्रामस्थांकडे असतं. मृत्यू झाल्यानंतर तिथल्या गावकरांनी जिथं अग्नी द्यायचा आहे. तिथं सगळी तयारी करुन ठेवली होती. सगळे नातेवाईक आल्यानंतर अखेर अग्नी देण्याच ठरवलं. अग्नी दिल्यानंतर चितेवरती डिझेल टाकलं जातं होतं. त्यावेळी सरणावरील निखारा डीझेल ठेवलेल्या साहित्याजवळ आला त्याचवेळी तिथं मोठा भडका उडाला. तिथं असलेली सगळी लोकं भयभीत झाली. तिघेजण भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

अद्याप राज्यातल्या अनेक खेडे गावांमध्ये स्माशानभूमी नाही

अद्याप राज्यातल्या अनेक खेडे गावांमध्ये स्माशानभूमी नाही. त्यामुळे पावसाळ्यात एखादा मृतदेह जाळताना तिथल्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो. अनेकदा नागरिकांनी आपल्या स्माशानभूमीची मागणी संबंधित सरकारला केली आहे. परंतु काही ठिकाणी ग्रामीण भागात स्मशानभूमी असल्याचे पाहायला मिळते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.