नाईट ड्युटीवर जाण्यास मनाई केल्याने शिवीगाळ, संतापलेल्या तिघांकडून चाकूने वार
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगर परिसरात घडली. (Nagpur Old Man Killed By three Person)
नागपूर : नागपुरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात किरकोळ वादातून एका 60 वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सम्हारु अवधू हरिजन असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. (Nagpur Old Man Killed By three Person)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगर परिसरात घडली. मृत व्यक्ती आणि तिन्ही आरोपी हे नागपूर मेट्रोच्या गांधीबाग साईटवर कामाला होते. तसेच ते चौघेही एकत्रच राहत होते. यावेळी मृत सम्हारु अवधू हरिजन याने तिन्ही आरोपींना नाईट ड्यूटीवर जाण्यास सांगितले. त्यावेळी या तिन्ही आरोपींनी मनाई केली.
यानंतर सम्हारू यांनी त्या तिघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे संतापलेल्या तिघांनी सम्हारूला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दिनेशकुमार मुन्ना लाला या आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने सम्हारूवर वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपींचा शोध घेतला असता ते पळून गेल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी रात्रभर शोध मोहिम राबवली. यावेळी आरोपी जबलपूरला पळून जात असल्याची माहिती मिळताच तिन्ही आरोपींना जबलपूरवरून अटक करण्यात आली आहे
दिनेशकुमार मुन्ना लाला, बजरंगी लालचंदप्रसाद गौतम आणि सुशीलकुमार दिपचंद गौतम अशी या तिन्ही आरोपींची नावं आहेत. मात्र नागपुरात हत्या होण्यासाठी काहीही कारण लागत नाही. या ठिकाणी अगदी क्षुल्लक कारणावरून सुद्धा हत्या होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. (Nagpur Old Man Killed By three Person)
संबंधित बातम्या :
कॉलेजला निघालेली तरुणी कालव्यात मृतावस्थेत, चुलतभावाने गळा दाबून संपवलं
मुंबईत ड्रग्स तस्करीसाठी माफियांचा नवा मार्ग, थेट निराधार महिलांचा वापर, एनसीबीकडून मोठी कारवाई
पत्नीसोबत अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीचा जीम मालकावर अॅसिड हल्ला