मित्राच्या वाढदिवसाला नाचला अन् थेट तुरुंगात गेला, नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुणाने जे केले त्यानंतर थेट तुरुंगातच रवानगी झाली. रील्स व्हायरल होताच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

मित्राच्या वाढदिवसाला नाचला अन् थेट तुरुंगात गेला, नेमकं काय घडलं?
नागपुरमध्ये हातात चाकू घेऊन रील्स बनवणे महागात पडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 3:31 PM

नागपूर : हल्ली सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुणाई काय करेल याचा नेम नाही. सतत पोलीस सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह कृती, व्हिडिओ करणाऱ्यांना कायद्याचा दंडुका दाखवण्यात येतो. मात्र तरीही तरुणाई आक्षेपार्ह व्हिडिओ करण्यात मागे नाही. अशीच एक घटना आज नागपुरात उघडकीस आली आहे. मित्राच्या वाढदिवसाला नको ते करण तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. वाढदिवसाच्या पार्टीत हातात चाकू घेऊन नाचत रील्स बनवली. रील्स व्हायरल होताच तरुण थेट ‘लॉकअप’मध्येच पोहचला. शुभम उर्फ प्रतीक फुलझले असे अटक तरुणाचे नाव आहे. तरुणाला अटक करत त्याची चौकशी केली असता त्याच्यावर असलेल्या इतर गुन्ह्यांची सुद्धा उकल झाली आहे.

हातात चाकू घेऊन नाचताना रील्स बनवली

नागपुरातील एका तरुणाला इन्स्टाग्रामवर हातात चाकू घेऊन इन्स्टाग्राम रील्स तयार करणे चांगलेच महागात पडले. शुभम उर्फ प्रतीक फुलझले नावाच्या तरुणाने आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त चाकू घेऊन डान्स केला. तो व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केला. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शुभमला पकडले. आरोपी शुभम आपला छंद पूर्ण करण्यासाठी वाहने चोरतो आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांनी शुभमकडून एक मोठा चाकू आणि व्हिडिओमध्ये वापरलेला चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.