फेसबुक लाईव्ह सुरु केलं, व्यथा मांडली, नंतर हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न, भयानक थरार कॅमेऱ्यात कैद

आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या एका 35 वर्षीय गायकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला (Nagpur Singer attempts suicide and live streams act on facebook).

फेसबुक लाईव्ह सुरु केलं, व्यथा मांडली, नंतर हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न, भयानक थरार कॅमेऱ्यात कैद
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 7:07 PM

नागपूर : नागपूरमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या एका 35 वर्षीय गायकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गायकाने फेसबुक लाईव्हत स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी फेसबुकवरील त्याच्या मित्रांनी त्याला समजवण्याचा फार प्रयत्न केला. याशिवाय त्याच्या नातेवाईकांनी फेसबुक लाईव्ह बघून त्याचं घर गाठत त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला (Nagpur Singer attempts suicide and live streams act on facebook).

गायक फेसबुक लाईव्हत काय म्हणाला?

“माझी आर्थिक परिस्थिती ठीक नाही. कोरोना संकट आल्यापासून परिस्थिती जास्त बिघडली. त्यामुळे जगणं अवघड होऊन बसलंय”, असं गायक फेसबुक लाईव्ह दरम्यान बोलतो. त्यानंतर तो आपल्या हाताची नस कापतो. हा सर्व प्रकार त्याचे मित्र बघतात. ते तातडीने त्याच्या घरी जातात. घरी गेल्यानंतर ते गायकाला रुग्णालयात घेऊन जातात. त्यामुळे गायकाचा जीव बचावला (Nagpur Singer attempts suicide and live streams act on facebook).

अनेकांना आश्चर्याचा धक्का

हा सर्व प्रकार शनिवारी (13 मार्च) घडला. गायकाचा लाईव्ह व्हिडीओ सुरु असताना अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. अनेक जण त्याला फेसबुकवर समजवण्याचा प्रयत्न करतात. अखेर त्याच्या काही मित्रांनी त्याचं घर गाठलं आणि त्याचा जीव वाचवला. संबंधित गायकाचा एक गृप आहे. मात्र, लॉकडाऊन काळात या गृपवर आर्थिक संकट ओढावलं.

नागपुरात ड्रम वादकाचाही आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान, 35 वर्षीय गायकाआधी नागपुरातील एका 22 वर्षीय ड्रम वादकाने देखील फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ड्रम वादकाने दहा ते बारा दिवसांआधी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याचा जीव वाचवला होता. गेल्या दहा-बारा दिवसातील कलाकारांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या या दोन घटना नागपुरात बघायला मिळाल्या आहेत.

हेही वाचा : मराठा समाज मागास आहे का?; वाचा, सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.