कोव्हिड वॉर्डच्या बाथरुममध्ये सलाईनच्या पाईपने गळफास, दोन बाधितांच्या आत्महत्यांनी शहर हादरलं

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये दोन वृद्ध कोरोनाबाधित रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. corona virus infected patient committed suicide

कोव्हिड वॉर्डच्या बाथरुममध्ये सलाईनच्या पाईपने गळफास, दोन बाधितांच्या आत्महत्यांनी शहर हादरलं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 4:46 PM

नागपूर: राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये दोन वृद्ध कोरोनाबाधित रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या पैकी 81 वर्षीय रुग्णाने तर कोव्हिड वॉर्डच्या बाथरूममध्ये सलाईनच्या पाईपने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुसऱ्या घटनेत 68 वर्षीय वृद्धाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून आत्महत्या करणारे दोन्ही रुग्ण हे 26 मार्च रोजीच कोरोना बाधित झाले होते. (Nagpur two corona virus infected patient committed suicide)

सलाईन पाईपच्या मदतीने गळफास

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटर मध्ये असलेल्या कोविड वॉर्डाचा बाथरूममध्ये सलाईनच्या पाईपने एका रुग्णाने स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून घेतल्याची सूचना डॉक्टरांना मिळाली होती. डॉक्टरांनी हॉस्पिटल स्टाफच्या मदतीने बाथरुमचे दार तोडले असता त्या ठिकाणी 81 वर्षीय वृद्ध पुरुषोत्तम आप्पाजी गजभिये हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी सलाईन पाईपच्या मदतीने गळफास लावला होता. या घटनेची माहिती समजताच अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे

वसंत कुटे यांची त्रास असह्य झाल्यानं आत्महत्या

दुसरी घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडली आहे. 85 प्लॉट परिसरात राहणारे 68 वर्षीय वसंत कुटे यांनी सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 26 मार्च रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते गृह विलगीकरणात होते. या दरम्यान त्यांना किडनी स्टोनचा त्रास वाढला होता . दोन दिवसांपासून हा त्रास असह्य होत असल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज कुंटे यांच्या कुटुंबीयांनी बांधला असल्याची माहिती अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिली आहे

नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाचा सख्या वाढत असल्याने रुग्णांना आता बेडस सुद्धा मिळणे कठीण झाले आहेत. अशा परिस्थितीत कोरोना रुग्ण आत्महत्या करत असल्याने मोठी चिंता वाढली आहे. नागपूरमध्ये सध्ये 45 हजार 322 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

संबधित बातम्या:

Corona | दिलासादायक…27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अ‌ॅक्टिव्ह केसेस 15 हजारांपेक्षा कमी

कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा

(Nagpur two corona virus infected patient committed suicide)

आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.