काय सांगता? पोलिसाच्या खिशात 10-20 हजार नव्हे.. तब्बल सव्वा दोन लाख सापडले!! नांदेडचा ग्रामीण पोलीस ACB च्या जाळ्यात!

लाचलुचपत विभागाने घेतलेल्या अंगझडतीत शिवाजी पाटील यांच्या खिशात तब्बल सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम सापडली. आता शिवाजी पाटील यांच्याविरोधात काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय सांगता? पोलिसाच्या खिशात 10-20 हजार नव्हे.. तब्बल सव्वा दोन लाख सापडले!! नांदेडचा ग्रामीण पोलीस ACB च्या जाळ्यात!
नांदेडचे पोलीस अंमलदार शिवाजी पाटील लाच घेताना अटकेत Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 1:20 PM

नांदेडः नांदेड जिल्ह्यातून एक मोठी बातमी हाती आली आहे. येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील (Nanded Rural police) एका कर्मचाऱ्याच्या खिशात तब्बल 02 लाख 25 हजार रुपये सापडले. लाच लुचपत विभागाकडे (Anti Corruption Bureau ) आलेल्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून संबंधित कर्मचाऱ्यावर पाळत ठेवली. या पोलीसाची अंग झडती घेतली असता त्याच्या खिशात 2 लाख 25 हजार रुपये सापडले. कर्मचाऱ्याने एकूण 21 हजार रुपयांची लाच घेतली होती. त्यापैकी 14 हजार त्याने रोख रक्कम घेतली तर उर्वरीत सात हजार लाचेची रक्कम त्याने चक्क फोन पे अॅपवर स्वीकारली. नांदेड (Nanded) ग्रामीण पोलिसात आढळून आलेल्या या प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. वाळूचे टिप्पर नियमित चालू ठेवावेत, यासाठी तक्रारदाराकडे या पोलीस कर्मचाऱ्याने लाच मागितली होती.

कधी आली तक्रार?

याविषयी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, 26 जून 2022 रोजी चाल लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार शिवाजी गंगाधर पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराला 3 वाळूचे टिप्पर नियमितपणे चालवू देण्यासाठी व वाळूच्या टिप्परवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रति टिप्पर 7 हजार याप्रमामे तीन टिप्परचे 21 हजार रुपये प्रतिमहा अशी मागणी केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. त्यापैकी 07 हजार रुपये यापूर्वी फोन पे अॅपद्वारे स्वीकारे तर उर्वरीत 14 हजार रुपये काल दिनांक 06 जून रोजी खासगी पोलीस सेवकाच्या हाताने स्वीकारली. हे पैसे रोख स्वीकार करतानाच त्यांना अटकत करण्यात आली. लाचलुचपत विभागाने घेतलेल्या अंगझडतीत शिवाजी पाटील यांच्या खिशात तब्बल सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम सापडली. आता शिवाजी पाटील यांच्याविरोधात काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लाच मागितल्यास इथे संपर्क साधा…

दरम्यान, लाचलुचपत विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या खासगी एजेंटने काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास तत्काळ साधावा. यासाठीचा दूरध्वनी क्रमांक- 02262- 253512 तसेच टोल फ्री क्रमांक 1064 यावर तक्रारदाराने माहिती देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.