काँग्रेस आमदाराच्या नातेवाईकाची भररस्त्यात हत्या, नांदेडमध्ये खळबळ

विष्णुपुरो भागातील व्यापारी बाजीराव हंबर्डे हे नांदेडमधील काँग्रेसचे कार्यकर्ते होते. शुक्रवारी त्यांचा मृतदेह नांदेडच्या वाघाळा रोडवर आढळला. पोलिसांनी तपास सुरु केला आहे

काँग्रेस आमदाराच्या नातेवाईकाची भररस्त्यात हत्या, नांदेडमध्ये खळबळ
व्यापारी बाजीराव हंबर्डे यांची हत्या
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 9:40 AM

नांदेड : काँग्रेसचे कार्यकर्ते आणि व्यापारी बाजीराव हंबर्डे यांचा मृतदेह रस्त्यात सापडल्यामुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हंबर्डे हे नांदेडमधील काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे (Congress MLA Mohanrao Marotrao Hambarde) यांचे जवळचे नातेवाईक होते. बाजीराव हंबर्डे यांच्या हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nanded Businessman Congress Volunteer Bajirao Hambarde Murdered)

नांदेडच्या वाघाळा रोडवर मृतदेह आढळला

विष्णुपुरो भागातील व्यापारी बाजीराव हंबर्डे हे नांदेडमधील काँग्रेसचे कार्यकर्ते होते. शुक्रवारी त्यांचा मृतदेह नांदेडच्या वाघाळा रोडवर आढळला. त्यांच्या मृतदेहाजवळ बाईकही सापडली आहे. बाजीराव हंबर्डे यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांची हत्या कोणी केली, हेही अद्याप समजलेलं नाही.

काँग्रेस आमदार मोहन हंबर्डेंचे नातेवाईक

बाजीराव हंबर्डे हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचे जवळचे नातेवाईक होते. बाजीराव हंबर्डे यांच्या भावाच्या तक्रारीवरुन हत्या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची राजकीय किंवा व्यावसायिक वैमनस्यातून झाली, की अन्य कारणामुळे याचा शोध पोलीस घेत आहेत.

गुन्हेगारी फोफावल्याचा आरोप

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी बोकाळल्याचं चित्र आहे. त्यातून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात रोजच गुन्हेगारी कृत्य घडत असल्याचं समोर येत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डा बनल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

कल्याणमध्ये रिक्षा चालक महिलेकडून पतीची हत्या

दुसरीकडे, 17 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाच्या हत्येचं गूढ उकलण्यात कल्याण पोलिसांना यश आलं आहे. रिक्षा चालक पत्नीने दोघा प्रियकरांच्या साथीने पतीच्या हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. कल्याण क्राईम ब्रांचने आरोपी महिलेसह तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

संबंधित बातम्या :

नांदेडमध्ये सख्खी बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या, भावाला फाशीची शिक्षा

कल्याणमधील तरुणाच्या मृत्यूचं गूढ उकललं, रिक्षाचालक पत्नीकडून दोन प्रियकरांच्या साथीने हत्या

(Nanded Businessman Congress Volunteer Bajirao Hambarde Murdered)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.