आधी रेनॉल्ट डस्टरची काच फोडली, मग शंभर शंभरचे बंडल लंपास केले! नांदेडमध्ये चोरांचा सुळसुळाट

Nanded Crime : गेल्या काही दिवसांत नांदेडमध्ये वाहनांच्या काचा फोडून रक्कमा पळवण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र यातील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने व्यापाऱ्यांत दहशतीचे वातावरण पसरलय.

आधी रेनॉल्ट डस्टरची काच फोडली, मग शंभर शंभरचे बंडल लंपास केले! नांदेडमध्ये चोरांचा सुळसुळाट
कारची काच फोडून रोकड लंपास
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 7:58 PM

तुम्ही जर गाडीमध्ये पैसे किंवा मौल्यवान वस्तू ठेवून नितांपणे दुसरीकडे जात असाल, तर वेळीच धोका ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे. बंद गाडीतूनही चोऱ्या होण्याच्या घटना सातत्यानं समोर येऊ लागल्यानं आता गाडीत पैशांसोबत कोणत्याही मौलव्यान गोष्ट ठेवणं हे धोक्याचं असल्याचं अधोरेखित होत असून अशीच एक घटना आता नांदेडमधून (Theft in Nanded) समोर आली आहे. नांदेडमध्ये शेतकरी आणि ठेकेदार असलेल्या एका इसमाच्या गाडीतून शंभर रुपयांचे बंडलच्या बंडल लंपास केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी गाडीत ठेवलेली रोकड चोरली आहे. नांदेडच्या मोंढा भागातील स्टेट बँकेसोबत (State Bank of India) हा धक्कादायक प्रकार घडला असून या चोरीप्रकरणी पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलिस चोरट्यांचा शोध घेत असून अधित तपास सुरु आहे. पेशानं ठेकेदार आणि शेतकरी असलेल्या नांदेडमधीलच एकाच्या रेनॉल्ट डस्टर (Renault Duster) कारमधून ही चोरी करण्यात आली आहे. गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी गाडीतील रोख रक्कम चोरली आहे.

चोरीचा घटनाक्रम

महादेव पिंपळगाव इथले रहिवासी असलेले शेतकरी आणि ठेकेदार गोविंदराव रामराव देशमुख हे एसबीआय बँकेत आले होते. गाडी पार्क करुन ते एसबीआय बँकेत एक आरटीजीएस करण्यासाठी बँकेत आले होते. बँकेत दोन तास त्यांचा कामादरम्यान वेळ गेला. दरम्यान, बँकेतून बाहेर आल्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या गाडीकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बाहेर आल्यानंतर त्यांच्या गाडीची काच कुणीतरी फोडल्याचं निदर्शनास आलं. इतकंच काय तर गाडीची डिकीदेखील उघडी होते, अशीही माहिती देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

दिवसाढवळ्या चोरी

देशमुख यांच्या गाडीमधील लाखभर रुपये होते. शंभर शंभर रुपयांचे बंडल त्यांनी गाडीत ठेवले होते. शंभरचे बंडल गाडीत ठेवून देशमुख हे बँकेत गेले होते. गाडी बंद करुन बँकेत गेलेल्या देशमुखांच्या कारमधून दिवसाढवळ्या चोरट्यांना रोकड लंपास केली आहे. यात देशमुख यांच्या कारचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या गाडीची ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या दरवाजाची काच चोरट्यांनी फोडली आणि त्यानंतर गाडीतील कॅशवर हात साफ केलाय.

गेल्या काही दिवसांत नांदेडमध्ये वाहनांच्या काचा फोडून रक्कमा पळवण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र यातील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने व्यापाऱ्यांत दहशतीचे वातावरण पसरलय. आता आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असून यासाठी पोलिसांनीही शोध मोहीम सुरु केली आहे.

संबंधित बातम्या :

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

लातुरात कोयत्यानं सपासप वार, नांदेडमध्ये खून करुन हाडं नदीत फेकली, 5 मित्रांनी आपल्याच मित्रांना का संपवलं?

Nanded Murder | हात-पाय बांधून लेकाला विहिरीत फेकलं, दुसऱ्या बायकोच्या मदतीने बापानेच काढला काटा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.