Nanded Murder : धाकट्या एकनाथने थोरल्या सतीशचा खून केला! अंगणात थुंकला म्हणून चाकूने भोसकला, सख्ख्या भावानेच केले सपासप वार

Nanded Crime News : नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील शिवराय नगर येथील ही घटना आहे.

Nanded Murder : धाकट्या एकनाथने थोरल्या सतीशचा खून केला! अंगणात थुंकला म्हणून चाकूने भोसकला, सख्ख्या भावानेच केले सपासप वार
नांदेडमध्ये हत्याकांड...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 9:39 AM

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded Crime) भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुल्लक वादातून थेट चाकू भोसकून छोट्या भावाने मोठ्या भावाचा खून (Nanded Murder News) केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रागाच्या भरात हे कृत्य करण्यात आलं. राग माणसाच्या हातून काहीही करवून घेऊ शकतो. रागाच्या भरात अनेकदा माणूस आपली सद्बुद्धी गमावतो आणि मग होत्याचं नव्हतं होतं. अशीच एक रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नांदेडमध्ये (Nanded News) घडली. या घटनेत अगदीच शुल्लक कारणावरून सख्ख्या भावाने भावाचीच चाकूने भोसकत हत्या केलीय. अंगणात थुंकल्याचा वादातून हे हत्याकांड घडलं. या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. छोट्या भावाने मोठ्या भावाच्या छातीमध्ये चाकूने सपासप वार केले.

नेमकी कुठे घडली घटना?

नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील शिवराय नगर येथील ही घटना आहे. नांदेडमध्ये अंगणात थुंकल्याच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरुन रक्तातील नातं असलेल्या सख्या लहान भाऊ एकनाथने सख्या भाऊ सतीश मोठ्या भावाचाच काटा काढला.

आजपर्यंत आपण मालमत्ता, पैशांचा वाद, शेतीचा वाद, जमिनीची वाटणी आणि अनैतिक संबंध अशा अनेक कारणांनी भावाने भावाचाच काटा काढल्याची उदाहरणं पाहिली आहेत. मात्र, नांदेडमधील शिवराय नगर येथील लहान भावाने मोठ्या भावाचा खून करण्याचे कारण ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. केवळ अंगणात थुंकण्याच्या कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला.

हे सुद्धा वाचा

थुंकण जीवावर बेतलं!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान भाऊ असलेला एकनाथ तुपसमुद्रे आणि मोठा भाऊसतीष तुपसमुद्रे यांच्यात अंगणात थुंकल्यावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात एकनाथने घरातून भाजी चिरण्याचा चाकू घेऊन सतीषच्या छातीत रागाच्या भरात सपासप वार केले. काही कळण्याच्या आत सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडला. शेजारच्या लोकांनी जखमी सतीशला रुग्णालयातही नेलं. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोकं धावले. मात्र एकनाथने घटनास्थळावरुन पलायन केलं.

सतीश आणि एकनाथ हे दोघे सख्खे भाऊ एकाच ठिकाणी राहतात. मात्र,अंगणात थुंकल्याच्या शुल्लक कारणाने सतीशला स्वतःचा जीव गमवावा लागला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी एकनाथ फरार झाला. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात एकनाथ तुपसमुद्रे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फरार आरोपी एकनाथला पोलिसांनी काही तासातच ताब्यातही घेतलंय. भाग्यनगर पोलिसांनी आरोपी एकनाथला कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.