Breaking | भरधाव ट्रकची अ‍ॅपे रिक्षाला धडक, 5 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी, कुठे घडली घटना?

भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक आणि अ‍ॅपे रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चौघे जागीच ठार झाले तर अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत.

Breaking | भरधाव ट्रकची अ‍ॅपे रिक्षाला धडक, 5 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी, कुठे घडली घटना?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 1:03 PM

राजीव गिरी, नांदेड: राज्यभरात रामनवमीचा उत्साह असतानाच नांदेडमधून एक भीषण घटना समोर आली आहे. भरधाव येणाऱ्या ट्रक आणि अ‍ॅपे रिक्षाची धडक झाली. या अपघातात अ‍ॅपे रिक्षाचा चक्काचूर झाला. गंभीर बाब म्हणजे अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर आणखी एक जण उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला. या घटनेतील अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Nanded

कुठे घडली घटना?

नांदेड ते मुदखेड मार्गावरील इजळी पाटी जवळ आज सकाळीच हा अपघात झाला आहे. सिमेंटने भरलेल्या ट्रकने ॲपे ऑटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय. यात एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.मुदखेडकडून नांदेडकडे येणाऱ्या ॲपे ऑटोला ट्रकने धडक दिली.या ॲपे ऑटोमध्ये जवळपास 15 प्रवाशी होते. हे सर्व जण वाजेगाव येथे मजुरी साठी जात होते. नांदेड कडून भरधाव येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने या ऑटोला जोराची धडक दिली. या अपघातात 4 जणांचा जागीच तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 6 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Nanded

मृतांची नावे

मुगट जवळ अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं पुढील प्रमाणे-

  • सरोजा रमेश भोई वय वर्षे ४० रा. मेहकर बुलडाणा
  • गाली कल्याण भोई वय वर्षे २४ रा गेवराई बिड
  • जोयल कल्याण भोई वय वर्षे ७ महीने
  • जेष्ठ नागरिक वय ७०- यांची आणि अन्य एका व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही

लातूरात रविवारी भीषण अपघात

अन्य एका घटनेत लातूर जिल्ह्यातल्या औसा-निलंगा रस्त्यावरच्या चलबुर्गा पाटी जवळ कार उलटल्याने रविवारी चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे येथून लग्न सभारंभ आटोपून सचिन बडूरकर आणि त्यांचे कुटुंबीय निलंग्याकडे परतत होते . त्यांची कार औसा तालुक्यातल्या चलबुर्गा पाटी जवळ आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात कार रस्त्याखाली जाऊन उलटली. या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांचा घटनास्थळीच मृत्य झाला. दोघे जण गंभीररीत्या जखमी केले. या अपघातात निलंगा येथील व्यवसायिक सचिन बडूरकर यांची दोन मुले अमर बडूरकर ( वय-१४) व जय बडूरकर ( वय-१०), पुतण्या अंश बडूरकर ( वय-१०) मेव्हणा प्रकाश कांबळे ( वय -२७) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . तर इतर दोघे जण जखमी झाले.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.