Nanded : नांदेडमध्ये कार-ट्रकची समोरासमोर धडक! भीषण अपघातात 4 ठार, गरोदर महिला जखमी

Nanded Accident News : चार जण ठार तर एक महिला गंभीर जखमी झालीय. रात्री उशिरा अपघाताची ही घटना घडलीय.

Nanded : नांदेडमध्ये कार-ट्रकची समोरासमोर धडक! भीषण अपघातात 4 ठार, गरोदर महिला जखमी
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 7:21 AM

नांदेड : नांदेडमधील भीषण अपघातात तिघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कार आणि ट्रकच्या धडकेत झालेल्या या भीषण अपघातामध्ये एक गरोदर महिला बालंबाल बचावली असून ती सध्या जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नांदेड – देगलूर मार्गावरील शंकरनगरजवळ ट्रकने कारला समोरासमोर धडक (Nanded Car Accident) दिली. त्यात चार जण ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. रात्री उशिरा अपघाताची ही घटना घडलीय. नरसी कडून देगलूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला (Swift car accident) समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली .यात कार मधील बिलोली येथील शंकर जाधव , महानंदा जाधव आणि कल्पना शिंदे असे तिघे जण जागीच ठार झाले. तर धनराज जाधव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय तर स्वाती शिंदे ही गरोदर महिला गंभीर जखमी असून शंकरनगर पोलिसांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलय. 3 जून रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली.

अपघातामधील मृतांची नावे :

  1. शंकर जाधव
  2. महानंदा जाधव
  3. कल्पना शिंदे
  4. धनराज जाधव

कसा झाला अपघात?

नायगाव तालुक्यातील रातोळीमधील टाकळी येथील जाधव कुटुंब शंकरनगरकडे जायला निघाले होते. मात्र कुंचेली फाट्यावर या कुटुंबाच्या गाडीला एका भरधाव ट्रकने समोरुन चिरडलं. हा अपघात प्रचंड भीषण होता. AP 03 TA 3186 नंबरच्या ट्रकने जाधव कुटुंबीयांच्या MH 25 T 1075 क्रमांकाच्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. स्विफ्ट कारचा या अपघातात चक्काचूर झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच तिघांचा मृत्यू झाला होता. तर कार चालक गंभीर जखमी अवस्थेत होता. कार चालकाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान कारचालक धनराज शंकर जाधव याचा मृत्यू झाला. स्वाती शिंदे ही महिला या अपघातात जखणी झाली आहे. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अपघातानंतर बचावकार्य करण्यासाठी वाहतूक थांबवण्यात आल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

साकिनाका बलात्कार प्रकरणी मोठी बातमी : Video

जखमी महिला गरोदर

या अपघातातील एक महिला बचावली आहे. ती गंभीर जखमी असून सदर महिला गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.