Video : रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात गरोदर महिला पडून! बाईक टर्न घेताना भरधाव बस आली आणि खल्लास..

Nanded Road Accident CCTV Video : शिवाजी डांगे हे पती-पत्नी आणि चंद्रकांत मोरे असे तिघे मिळून एका दुचाकीवरून जात होते. पेट्रोल पंपाजवळ दुचाकी रस्ता ओलांडत होती.

Video : रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात गरोदर महिला पडून! बाईक टर्न घेताना भरधाव बस आली आणि खल्लास..
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 8:10 AM

नांदेड : नांदेडमध्ये भीषण (Nanded Road Accident) अपघात घडला. एका दुचाकीला खासगी बसने (Bus hits bike) धडक दिली. त्यात गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. संपूर्ण शरीरावरुन बस गेल्यानं गरोदर महिलेनं जागीच जीव सोडला. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती. दुचाकी रस्ता ओलांडत असतेवेळी हा अपघात थरारक अपघात घडला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद (Accident caught in cctv) झाला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघातात गरोदर महिलेच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्यात. या अपघातात दुचाकीवरील कुणीही हेल्मेट घातलेलं नव्हतं. शिवाय एकावेळी तिघे जण दुचाकीवरुन चालले होते. दोन पुरुष आणि त्यात एक गरोदर महिला दुचाकीवरुन जात असताना हा भीषण अपघात झाला. या महिलेचा अंत झाला असून इतर दोघे जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. तर प्रवासी बसही ताब्यात घेण्यात आली. हा अपघात झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

नेमका कुठे घडला अपघात?

नांदेडहून त्रिकुटकडे जाणाऱ्या दुचाकीला खाजगी बसने धडक दिली. यात एक 22 वर्षीय गरोदर महिलेला बसचे चिरडलं आणि त्यात या महिलेच्या चिंधड्या उडाल्यात. बावीस वर्षांची गरोदर महिला जागीच ठार झाली तर अन्य दोनजण जखमी झाले. बसने धडक दिल्यानंतर तिघेजण रस्त्यावर फरफटत गेले होते. तर धडक दिल्याचं लक्षात आल्यानंतर बसचा वेग कमी झाला आणि चालकानं पुढे जाऊन बस थांबवली. पण तोपर्यंत महिलेचा जागीच जीव गेला होता. रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात गरोदर महिला पडून होती.

विचलीत करणारी दृश्य

अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. अत्यंत विचलीत करणारी ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओमधून समोर आली आहेत. मंगळवारी (25 एप्रिल) दुपारी नांदेड शहराजवळील माळटेकडी पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला.

शिवाजी डांगे हे पती-पत्नी आणि चंद्रकांत मोरे असे तिघे मिळून एका दुचाकीवरून जात होते. पेट्रोल पंपाजवळ दुचाकी रस्ता ओलांडत होती. नेमक्या त्याच वेळी भरधाव वेगानं येत असलेल्या खाजगी बसने त्यांना धडक दिली आणि चिरडलं. दुचाकीला बसने चिरडलेला क्षण सीसीटीव्हीत कैद झाला. या अपघातात इंदूबाई ही गरोदर महिला चिरडली गेल्याने जागीच ठार झाली तर दोन जण गंभीर जखमी झालेत.

अपघाताचा थरार : ही दृश्य विचलीत करणारी आहेत

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.