Nanded | बिल्डर Sanjay Biyani हत्याकांडाचे गूढ उकलणार? बियाणींचा गहाळ मोबाइल सापडला, तपासाकडे महाराष्ट्राचे लक्ष!

संजय बियाणी यांच्या हत्येचे गूढ लवकरात लवकर उघडण्याची मागणी अधिक तीव्र होत असून अनेक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोलंबी गावच्या नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Nanded | बिल्डर Sanjay Biyani हत्याकांडाचे गूढ उकलणार? बियाणींचा गहाळ मोबाइल सापडला, तपासाकडे महाराष्ट्राचे लक्ष!
नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरणImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 10:22 AM

नांदेड: बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येला एक आठवडा होत असला तरीही अद्याप मारेकऱ्याचे गूढ उकलेले नाही. या तपासात एक महत्त्वाची घडमोड घडलीय. ती म्हणजे संजय बियाणी यांचा गहाळ असलेला मोबाइल (Mobile) पोलिसांना सापडला आहे. त्यामुळे हत्येच्या दिवशी संजय बियाणी यांचा कुणाशी संवाद झाला होता, हे मोबाइलवरून उघड होईल. त्यातून हत्येचा सुगावा लागू शकेल, अशी आशा आहे. त्यामुळे या मोबाइलच्या माध्यमातून नेमकी काय माहिती उघड होतेय, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 5 एप्रिल रोजी संजय बियाणी यांची नांदेडमधील त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या (Murder case) करण्यात आली होती. त्यानंतर अवघं नांदेड हादरलं होतं. बियाणींच्या मारेकऱ्याला तत्काळ अटक करा, वेगाने तपास करा अशी मागणी करत अवघं नांदेड एकवटलं असून अद्याप या प्रकरणी महत्त्वाचा काहीही शोध लागलेला नाही. त्यामुळे हत्येचं गूढ कधी उकलतंय, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

संजय बियाणी हत्याकांड घटनाक्रम असा-

  1.  गरीबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देणारे, अशी ख्याती असलेल्या संजय बियाणींना पूर्वी खंडणीखोरांच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे त्यांना सुरक्षाही देण्यात आली होती.
  2.  तीन महिन्यांपूर्वी बियाणींची सुरक्षा कमी करण्यात आली. हत्येच्या एक आठवडा आधीच त्यांनी 73 कुटुंबांना स्वस्त घरे उपलब्ध करून दिली होती.
  3.  5 एप्रिल रोजी मंगळवारी संजय बियाणी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घराबाहेर निघत होते.
  4.  एवढ्यात दुचाकीवर आलेल्या दोघांनी दुचाकी थांबवत त्यांच्यावर अगदी जवळून चार गोळ्या झाडल्या.
  5.  यात संजय बियाणी मि त्यंचे कर चालक गंभीर जखमी झले.
  6. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच संजय बियाणी यांचा मंगळवारी मृत्यू झाला.
  7. 06 एप्रिल रोजी संजय बियाणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय एकवटला होता. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते.
  8. बियाणी यांच्या हत्येचा तपास वेगाने होण्यासाठी विविध समाज आणि संघटनांकडून मोर्चे आणि निवेदने देण्यात आले.
  9. 07 एप्रिल रोजी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.
  10. तसेच नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांची भेट घेत केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत हा तपास करावा, अशी मागणी केली.
  11.  एकूणच संजय बियाणी यांच्या हत्येचे गूढ लवकरात लवकर उघडण्याची मागणी अधिक तीव्र होत असून अनेक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोलंबी गावच्या नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

इतर बातम्या-

मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरची उभ्या आयशरला धडक; एका चालकाचा मृत्यू, एक जखमी

Face Check | व्यवहारापूर्वी एटीएमवर दोनदा Cancel बटण दाबा, पिन चोरीचे टेन्शन नाही, दावा खरा?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.