Nanded Biyani Murder : बिल्डर संजय बियाणींच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश! हत्येमागे मोठं षडयंत्र
हत्याकांड प्रकरणी आठ संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आलंय. खंडणी आणि दहशत पसरवण्यासाठी आरोपीनी ही हत्या केल्याचे सांगण्यात येतंय.
नांदेड : नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना (Nanded Police) यश आलय, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडात 6 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. खंडणी आणि दहशत पसरवण्यासाठी आरोपीनी ही हत्या केल्याचे सांगण्यात येतंय. बियाणी यांच्या हत्येमागे कुख्यात गुंड रिंधाचा संबध असून त्यात मोठे षडयंत्र असल्याची माहिती आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी लवकरच पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहिती देणार आहेत. गेल्या पाच एप्रिल रोजी दिवसाढवळ्या संजय बियाणी यांची राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या झाली होती. या हत्येनंतर पोलिसांविरोधात मोठा रोष व्यक्त करण्यात येत होता, आता दोन महिन्यांनी का होईना मात्र या हत्येचा (Nanded Murder) संपूर्ण तपास लावण्यात पोलिसांना यश आलय.
काय आहे बियाणी हत्या प्रकरण?
5 एप्रिल 2022 रोजी संजय बियाणींवर प्राणघात हल्ला करण्यात आला. 5 एप्रिलला सकाळी 11च्या सुमारास नांदेडमधील सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणींवर राहत्या घराबाहेरच चार गोळ्या झाडण्यात आलेल्या. या जीवघेण्यात हल्ल्यामध्ये संजय बियाणींना गंभीर जखमा झाल्या होत्या. ते रक्ताच्या थारोळ्यातच पडले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आलेलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. खंडणी वसुलीच्या इराद्यानं त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला होता. तर दुसरीकडे सुपारी देऊन पतीची हत्या झाल्याचा आरोप संजय बियाणी यांच्या पत्नीकडून करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेजही समोर
संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आलं होतं. गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघांनी गोळीबार केला होता. दुचाकीवरुन येत दोघांना संजय बियाणींवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या होत्या. गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्येमुळे संपूर्ण नांदेडमध्ये खळबळ उडाली होती. नांदेडमधील बांधकाम व्यावसायीक या हत्येच्या घटनेनं धास्तावले होते.
Sanjay Biyani Firing CCTV | बिल्डर संजय बियाणींची हत्या, गोळीबाराचं सीसीटीव्ही फूटेज समोर #SanjayBiyani #Nanded #Crime #Firing #CCTV #Murder pic.twitter.com/D5FffCDssc
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2022
दोन महिन्यांपासून तपास
गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांकडून या हत्याप्रकरणाचा तपास सुरु होता. संजय बियाणींच्या हत्येमागे मोठं षडयंत्र असल्याचा पोलिसांना संशय होता. हत्येसाठी वापरलेली बाईक, मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज या सगळ्याच्या मदतीने पोलिसांनी अखेर या हत्याकांडाचा छडा लावलाय. संजय बियाणींच्या हत्येप्रकरणी एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.