Nanded : संजय बियाणी हत्याप्रकरण! आणखी दोघांना अटक, एकूण आरोपींची संख्या पोहोचली 9 वर

Nanded Sanjay Biyani Murder Case :

Nanded : संजय बियाणी हत्याप्रकरण! आणखी दोघांना अटक, एकूण आरोपींची संख्या पोहोचली 9 वर
संजय बियाणी हत्याकांड प्रकरणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 7:59 AM

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) झालेल्या बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) यांच्या हत्याप्रकरणी अटकेची कारवाई सुरुच आहे. शनिवारी आणखी दोघा आरोपींनी पोलिसांनी बियाणींच्या हत्येप्रकरणी (Nanded Crime News) अटक केली. नांदेड पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. कृष्णा पवार आणि हरीश बाहेती, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. कृष्णा पवार हा आमदुरा इथला असून बाहेती हा नांदेडच्या मारवाड गल्लीतील राहणार आहेत. बाहेरी हा देखील एक व्यापारी आहे. आतापर्यंत एकूण 9 जणांना संजय बियाणींच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संजय बियाणींच्या हत्येपूर्वी आरोपींनी नांदेडमध्ये दोन महिने रेकी केली होती. तसंच बियाणी यांच्यावर पाळतही ठेवण्यात आली होती. तर बरेच दिवस नांदेडच्या एका हॉटेलमध्ये आरोपी वास्तव्यास होते, अशीही माहिती समोर आली आहे.

नुकतीच पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना अटक केली असल्याची माहिती दिली होती. तसंच या हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात यश आल्याचीही माहिती पोलिसांनी दिली होती. संपूर्ण नांदेड संजय बियाणींच्या हत्येनंतर हादरलं होतं. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडानं पोलिसांवरही अनेक सवाल उपस्थित केले होते. अखेर नांदेड पोलिसांनी महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात या हत्येचा तपास केला. त्यानंतर सात जणांना अटक करत या हत्येचा छडा दीड महिन्यात लावला होता.

पाहा व्हिडीओ :

आता पर्यंत कुणाकुणाला अटक?

  1. इंद्रपालसिंघ ऊर्फ सनी पि. तिरथसिंघ मेजर
  2. मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे
  3. सतनामसिंघ ऊर्फ सत्ता पि दलबिरसिंघ शेरगिल
  4. हरदिपसिंध ऊर्फ सोनु पिनीपाना पि. सतनामसिंध बाजवा
  5. गुरमुखसिंध ऊर्फ गुरी पि. सेवक
  6. करणजितसिंघ पि. रघबिरसिंघ साहू
  7. हरदीपसिंग सपुरे
  8. कृष्णा पवार
  9. हरीश बाहेती

5 एप्रिल रोजी संजय बियाणींच्या हत्याप्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. गाडीतून बाहेर पडतानाच दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी संजय बियाणी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. संजय बियाणींवर बंदुकीनं गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात संजय बियाणी जागीच ठार झाले होते.

का करण्यात आली होती हत्या?

कुख्यात गुंड रिंदा यांना संजय बियाणींना खंडणीसाठी धमकी दिली होती. खंडणी वसुलीतूनच बियाणींची हत्या करण्यात आली होती, असं पोलिस तपासात निष्पन्न झालंय. खंडणीसाठी देण्यात आलेल्या धमकीनंतर बियाणींना पोलीस सुरक्षाही देण्यात आली होती. मात्र हत्येच्या तीन महिने आधीच त्यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आलेली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.