Nanded Suicide : अपमान झाल्यानं आत्महत्या! मोबाईल चोरीचा आळ घेत मारहाण, मग विषप्राशन
Nanded Crime News : बलू चितोडीया असं आत्महत्या केलेल्या तरुणानं नाव आहे. ते मूळचे अमरावतीचे असल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेड : अपमान सहन झालेल्या तरुणानं पुण्यात आत्महत्या (Suicide because of insult) केल्याची घटना ताजी असतानाचा आता नांदेडमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणावर चोरीचा आळ घेण्यात आला होता. या तरुणाला त्यानंतर मारहाणही करण्यात आलेली. दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे बिथरलेल्या तरुणानं अखेर विष प्राशन करत आत्महत्या (Nanded Suicide) केली आहे. या तरुणानं विष प्राशन केल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आलेलं. मात्र या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे या मुलाच्या मृत्यूला कारणभूत ठरल्याचा ठपका ठेवत चौघांवर गुन्हाही (Nanded Crime News) दाखल करण्यात आलाय. बबलू चितोडीया असं आत्महत्या केलेल्या तरुणानं नाव आहे. ते मूळचे अमरावतीचे असल्याची माहिती समोर आली आहे. बबलू चितोडीया हे जडीबुटी विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या आत्महत्येनंतर आता त्यांची पत्नी पोरकी झाली आहे.
महिनाभर उपचार, पण…
बबलू चितोडीया या जटीबुटी विकणाऱ्या तरुणावर मोबाईल चोरीचा आरोप करण्यात आला होता. यावेळी त्याला मारहाणही करण्यात आली होती. 9 मार्च रोजी ही घटना घडली होती. बालाजी गणपती ढाले आणि इतर तिघांनी बबलूवर मोबाईल चोरी कल्याचा आरोप करत त्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली होती. लोहा तालुक्यातील गोळेगाव फाट्यावर हा सगळा प्रकार घडला होता.
दरम्यान, आपल्या झालेल्या प्रचंड मारहाणीमुळे निराश झालेला बबलू चितोडीया बिथरला होता. अखेर त्यानं अस्वस्थ होऊन उंदीर मारण्याचं औषध प्राशन केलं होतं. सुरुवातीला त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. नंतर घरीदेखील सोडण्यात आलेलं.
घरी आणल्यानंतर बबलूची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यामुळे त्याला पुन्हा विष्णुपुरी इथल्या रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान, बबलूचा मृत्यू झाला. आता बबलूच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. अस्माननगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.