अक्षरशः हैवानीयत; येवल्यात लाकडी दांडक्याने गुरासारखी मारहाण, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ!

येवल्यात एकमेकांंना गुरासारखी मारहाण करणारे सारेच तरुण आहेत. यातले बहुतांश जण स्मार्टफोन वगैरे वापरत असतील. त्यामुळे एकीकडे आपण जग जवळ आले असेही म्हणतो. मात्र, इथे या स्मार्टफोनचा उपयोग फक्त ही मारहाण टिपण्यासाठी झाला. आपण जगातले नाही ते शिकलो. मात्र, शहाणपण आणि सभ्यतेचा गुण आपण कोणाकडूनही घेत नाही.

अक्षरशः हैवानीयत; येवल्यात लाकडी दांडक्याने गुरासारखी मारहाण, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ!
नाशिकमधल्या येवल्या तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक येथे झालेली तुंबळ मारहाण.
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 12:20 PM

येवलाः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या येवल्या (Yeola) तालुक्यात दोन गटांत अक्षरश गुरासारखे एकमेकांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. चक्क लाकडी दांडके घेत एकमेकांना बदडणे सुरू होते. हा भयंकर प्रकार पाहून काही जणांना सहानुभूती वाटली. त्यांनी हे भांडण सोडवण्यासाठी धाव घेतली. मात्र, कसले काय. या बिचाऱ्यांनाही भांडण करणाऱ्यांनी प्रसाद दिला. यात अनेकजणांना मुका मारला लागला आहे. तर काही जण जखमी झालेत. पोलिसांनी या प्रकरणी येवला शहर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करून धरपकड सुरू केलीय. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हे पाहून कोणाही सर्वसामान्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

आठ जणांना बेड्या

येवला तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक येथील ही घटना आहे. गावातल्या दोन गटामध्ये किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. या घटनेतील बहुतांश सहभागी हे तिशीच्या आतील तरुण आहेत. त्यांनी रस्त्यावर राडा सुरू केला. घरात सरपणासाठी ठेवलेली मोठ-मोठी लाकडे उचलून आणत एकमेकांच्या डोक्यात घातली. हा प्रकार इतका भंयकर होता की, पाहणाऱ्या कोणत्याही सामान्याच्या काळजाचा ठोका चुकेल.

महिलांनाही सोडले नाही

भांडण करणारे दोन गट इतके बेभान झाले होती की, त्यांनी महिलांनाही गुरासारखी मारहाण केली. त्यामुळे रस्त्यावर फक्त आरडाओरडा आणि किंकाळ्या होत्या. हे पाहून अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्यांनाही लाकडी दांडक्याचा प्रसाद मिळाला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. इतरांचा शोध घेणे सुरू केले आहे.

‘त्या’ मोबाईलचा उपयोग कशासाठी?

येवल्यात एकमेकांंना गुरासारखी मारहाण करणारे सारेच तरुण आहेत. यातले बहुतांश जण स्मार्टफोन वगैरे वापरत असतील. त्यामुळे एकीकडे आपण जग जवळ आले असेही म्हणतो. मात्र, इथे या स्मार्टफोनचा उपयोग फक्त ही मारहाण टिपण्यासाठी झाला. आपण जगातले नाही ते शिकलो. मात्र, शहाणपण आणि सभ्यतेचा गुण आपण कोणाकडूनही घेत नाही. त्यामुळेच रस्त्यावर चक्क महिलांचे कपडे फाडले जातात. त्यांना अशीच जीवघेणी मारहाण होते. हे कुठले शहाणपण? ते आपण कधी शिकणार आहोत?

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.