Dr Suvarna Waje | डॉ. सुवर्णा वाजेंसोबत घातपातच, डीएनए अहवालातून धक्कादायक माहिती, संशयाची सुई कोणावर?
वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या मृतदेह डीएनए एकच असल्याने नाशिक महापालिकेतील अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.
नाशिक : नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे (Dr Suvarna Waje) यांच्यासोबत घातपात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वाजे यांच्या हाडांचा डीएनए अहवाल (DNA Report) नाशिक ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला आहे. वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डॉ. सुवर्णा वाझे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महापालिकेच्या (Nashik) सिडको रुग्णालयात कार्यरत होत्या. 25 जानेवारी मंगळवारी रात्री नाशिक-मुंबई महामार्गावर मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ही हाडे डॉ सुवर्णा वाजेंचीच असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. माहेरच्या नातेवाईकांनीही त्यांना काही माहिती दिल्याचे समजते. तसेच डॉ. वाजे यांच्या पतीकडूनही माहिती घेण्यात आली आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांची गाडी जाळण्यासाठी संशयिताने कोणत्या ज्वलनशील पदार्थाचा वापर केला, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत.
नेमकं काय घडलं?
डॉ. सुवर्णा वाजे-जाधव बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. 25 जानेवारी मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. ती हाडे आणि तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, हे तपासण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली होती. त्यात वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सायंकाळपर्यंत ‘ओपीडी’मध्ये
डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली होती. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे 25 जानेवारी रोजी, मंगळवारी सायंकाळीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. मात्र, काही क्षणात होत्याचे नव्हते कसे झाले, अचानक असे काय घडले, याचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
संबंधित बातम्या :
डॉ. सुवर्णा वाजेंच्या खुनाचे गूढ काय, जळालेली हाडे कुणाची, कुटुंबाच्या जबाबवरून पोलीस गाठणार स्वर्ग?
डॉ. सुवर्णा वाजेंनी पतींना रात्री तसा मेसेज का केला, त्यांच्यासोबत कोण होते, मृत्यूचे गूढ काय?
नाशिकमध्ये महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ