कौटुंबिक वाद टोकाला गेला, जावई आणि मुलाचा मायलेकीवर विळ्याने हल्ला, मानलेली मुलगी गंभीर जखमी
दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्यावेळी परिसरात हल्ला झाल्याची माहिती समजली, त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) प्राणघातक हल्ल्यांची मालिका सुरूच असून, पंचवटी परिसरातील पेठरोड भागात (pachvati pethroad area) कौटुंबिक वादातून जावई आणि मुलाने आईसह तिच्या मानलेल्या कन्येवर धारदार विळ्याने हल्ला केला आहे. हल्ला इतका भयानक होता की, मानलेली मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आईला सुध्दा जखम झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अरुणा लोखंडे असे आईचे नाव असून, त्यांनी मानलेली मुलगी आरती वानखेडे सद्या गंभीर आहे. दोघी मायलेकींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (nashik government hospital) उपचार सुरु आहेत.
जावई आणि मुलाचा मायलेकीवर विळ्याने हल्ला
पंचवटीतील पेठरोड दिंडोरी नाक्यावरील अभिषेक स्विटस् मागे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात आरती वानखेडे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. आई अरुणा एकनाथ लोखंडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा जावई संशयित मनोहर सोमनाथ मोंढे याचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद आहेत. या वादास आरती वानखेडे कारणीभूत असल्याचा आरोप करीत अरुणा यांचा जावई मनोहर मोंढे आणि अरुणा यांचा मुलगा मनिष एकनाथ लोखंडे याने आरतीवर हल्ला केला. यात मनोहरने विळ्याने वार केल्याने आरतीला गंभीर दुखापती झाली आहे. त्यांना 108 या रुग्णवाहिकेने तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमीची चौकशी केली. तसेच पंचवटी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मुलगा आणि जावई…
दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्यावेळी परिसरात हल्ला झाल्याची माहिती समजली, त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येणार आहे. पोलिस तिथं आजूबाजूला असलेल्या लोकांकडे चौकशी करीत आहेत. गंभीर गुन्हा केल्याने यामागे मोठं कारण असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जिथं हल्ला झाला तिथं जाऊन पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याचबरोबर हल्ला केलेला विळा ताब्यात घेतला आहे.