भोगी विषयांचा सोहळा; घोरपडीचे गुप्तांग, साळिंदराच्या काट्याची पूजा भांडारात विक्री, राज्यव्यापी कनेक्शन

घोरपडीचे गुप्तांग आणि इतर प्राण्यांच्या अवयवाचा उपयोग लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी होतो, असा दावा हे भामटे करतात. त्यांच्या बोलण्याची भुरळ पडून अनेक जण या अवयवांची खरेदी करतात. त्यासाठी भलीमोठी रक्कमही मोजतात. मात्र, ही सारी अंधश्रद्धा आहे.

भोगी विषयांचा सोहळा; घोरपडीचे गुप्तांग, साळिंदराच्या काट्याची पूजा भांडारात विक्री, राज्यव्यापी कनेक्शन
वन्यजीवांचे नाशिकमध्ये जप्त केलेले अवयव.
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 11:52 AM

नाशिकः संत तुकोबारायांचा (Saint Tukaram) पाखंडी लोकांना वठणीवर आणणारा एक अभंगय. तो अनेकांनी शाळेतही (School) अभ्यासला असेल. त्यात महाराज म्हणतात…

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू । अंगा लाउनिया राख । डोळे झाकुनी करती पाप । दावूनी वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा । तुका म्हणे सांगों किती । जळो तयांची संगती ।

हा अभंग आत्ता आठवण्याचे कारणही तसेच. पश्चिम भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये एका पूजा साहित्य भाडांरात चक्क घोरपडीचे गुप्तांग, साळिंदराचा काटा, सी – फॅन आणि इतर वन्यजीवांच्या अवयवांची विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर, सांगली आणि नाशिकच्या पथकाने जेव्हा येथे छापा टाकला तेव्हा ही पोलखोल झाली. वन्यजीवांना अतिशय क्रूरपणे ठार करून. त्यांच्या अवयवांचा चक्क धार्मिक दुकानातून मांडलेला बाजार मानवी विकृतीचा कळसच मानावा लागेल. विशेष म्हणजे तस्करांचे हे राज्यव्यापी कनेक्शन आहे.

कसा लागला सुगावा?

राज्यभरात वन्यजीवांचे अवयव विकणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. त्यात वनविभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात असे तब्बल 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याचे धागे थेट गोदाकिनारी वसलेल्या नाशिकनगरीमध्ये येऊन पोहचले. नाशिकच्या दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल महेंद्र पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, गणेश झोळे, सांगलीचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, कोल्हापूरचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या पथकाने पंचवटी येथील लक्ष्मी पूजा साहित्य भांडारावर छापा टाकला. तेव्हा दुकानात विक्रीसाठी ठेवलेले घोरपडीचे गुप्तांग, इंद्रजाल, समुद्री कंकाळ, पंजे, साळिंदर, रानडुकराचे दात, शरीरावरील काटे आदी अवयव सापडले.

कशी केली कारवाई?

वनपथकातील अजित साजणे यांनी बुवांचा वेष परिधान करून आणि कपाळावर भस्म लावून पूजा साहित्याची विक्री करणाऱ्या लक्ष्मी भाडांर दुकानात प्रवेश केला. दुकानमालक कैलास कुलथे याला वन्यजीवांच्या अवयव पाहिजे असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना इशारा करताच त्यांनी दुकानावर छापा टाकला. यावेळी वन्यजीवांबाबत अंधश्रद्धा पसरविणारी काही पुस्तकेही जप्त करण्यात आली. कोल्हापूर, सांगली, सातारा येथून वन्यजीवांचे अवयव आणल्याची कबुली दुकान मालकाने दिली असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

कशासाठी करतात उपयोग?

घोरपडीचे गुप्तांग आणि इतर प्राण्यांच्या अवयवाचा उपयोग लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी होतो, असा दावा हे भामटे करतात. त्यांच्या बोलण्याची भुरळ पडून अनेक जण या अवयवांची खरेदी करतात. त्यासाठी भलीमोठी रक्कमही मोजतात. मात्र, ही सारी अंधश्रद्धा आहे. याला बळी पडून बहुमूल्य अशी वन्यजीव संपदा नष्ट करण्यात येत आहे. आता या विरोधात वनविभागाने जोरदार आघाडी उघडून तस्कराची राज्यभराती पाळेमुळे खणणे सुरू केले आहे.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.