लाखोंची फसवणूक, कर्जदाराचा तगादा; नवदाम्पत्याने सुसाईड नोट लिहत आयुष्यच संपवले !

नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीत जगताप दाम्पत्य राहत होते. या जोडप्याने एका व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी सदर व्यक्तीने जगताप दाम्पत्याकडे तगादा लावला होता.

लाखोंची फसवणूक, कर्जदाराचा तगादा; नवदाम्पत्याने सुसाईड नोट लिहत आयुष्यच संपवले !
नाशिकमध्ये नवविवाहित दाम्पत्याने संपवले जीवनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 7:33 PM

नाशिक / चैतन्य गायकवाड (प्रतिनिधी) : कर्जबाजारीपणा आणि देणेकऱ्यांच्या सततच्या तगाद्याला कंटाळून एका नवदाम्पत्याने आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील पाथर्डी येथे घडली आहे. गौरव जगताप आणि नेहा जगताप अशी आत्महत्या करणाऱ्या नवदाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. जोडप्याने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. इंदिरानगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

जोडप्याने कर्ज घेतले होते

नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीत जगताप दाम्पत्य राहत होते. या जोडप्याने एका व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी सदर व्यक्तीने जगताप दाम्पत्याकडे तगादा लावला होता.

पैसे परत करण्यासाठी देत होते त्रास

मात्र तरीही पैसे मिळत नसल्याने तो व्यक्ती जगताप यांना त्रास देत होता. पैसे परत करण्यासाठी धमक्याही देत होता. अखेर या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे जगताप दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण नमूद

नातेवाईकांनी देव्हाऱ्यात एक डायरी सापडली. या डायरीत ही सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये पैशांसाठी होणाऱ्या त्रासाला आणि काही लोकांकडून लाखोंची फसवणूक झाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आली आहे. पोलिसांनी ही डायरी ताब्यात घेतली आहे.

‘अशी’ उघडकीस आली घटना

गौरवच्या मावशीने त्याला कॉल केला होता, त्याने उचलला नाही. मग तिने नेहाला कॉल केला तिनेही उचलला नाही. वारंवार फोन लावूनही फोन उचलले नाहीत म्हणून मावशीने गौरवच्या भावाला सांगितले. दोघेही फोन उचलत नसल्याने घरी जाऊन पहायला सांगितले.

गौरवचा भाऊ घरी आला आणि बराच वेळ दारावर बेल वाजवत होता. मात्र आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. यानंतर त्याच्या भावाने सोसायटीतील लोकांना बोलावून याबाबत सांगितले आणि दरवाजा तोडला.

दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता दोघे पती-पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. याबाबत तात्काळ इंदिरानगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी सुसाईड नोटच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.