AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime : नाशिकमधील देवळा जळीतकांड प्रकरण, पाचही आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी

आरोपी मुलीचे आणि पीडित तरुणाचे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे काही कारणाने ब्रेकअप झाले. यानंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. परंतु मुलाकडच्यांनी नंतर लग्न मोडले. यामुळे पीडित तरुणानेच ब्रेकअपच्या रागातून लग्न मोडले असा संशय मुलगी आणि तिच्या घरच्यांना आला. याच संशयातून मुलगी, तिचे आई-वडिल आणि दोन भाऊ यांनी मुलाच्या गावात जाऊन त्याला जाब विचारत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

Nashik Crime : नाशिकमधील देवळा जळीतकांड प्रकरण, पाचही आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी
नाशिकमधील देवळा जळीतकांड
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 9:56 PM
Share

नाशिक : प्रेमप्रकरण व लग्न मोडल्याप्रकरणी प्रेयसी (Girlfriend)नेच कुटुंबाच्या मदतीने प्रियकरा (Boyfriend)ला जाळण्याचा प्रकार शुक्रवारी नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर गावात घडला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या प्रेयसी व तिच्या कुटुंबियांना शनिवारी न्यायालयासमोर उभे असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. या घटनेत प्रियकर गोरख बच्छाव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेत तरुण 80 टक्के भाजल्याची माहिती मिळते. देवळा पोलिसांनी याप्रकरणी प्रेयसी कल्याणी सोनवणेसह तिची आई, वडील व दोन भाऊ अशा पाच जणांना अटक केली आहे. (All five accused in Nashik youth attack case remanded in police custody for 3 days)

ब्रेकअप झाल्यामुळे प्रियकरानेच लग्न मोडल्याच्या संशयातून घडली घटना

आरोपी मुलीचे आणि पीडित तरुणाचे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे काही कारणाने ब्रेकअप झाले. यानंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. परंतु मुलाकडच्यांनी नंतर लग्न मोडले. यामुळे पीडित तरुणानेच ब्रेकअपच्या रागातून लग्न मोडले असा संशय मुलगी आणि तिच्या घरच्यांना आला. याच संशयातून मुलगी, तिचे आई-वडिल आणि दोन भाऊ यांनी मुलाच्या गावात जाऊन त्याला जाब विचारत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या मुलाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तसेच मुलीसह तिच्या कुटुंबातील पाच जणांना अटक केली. यानंतर या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

अंधेरीत मायलेकाकडून बँक अधिकाऱ्याची हत्या

कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाने मिळून बँक अधिकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात उघडकीस आली आहे. आधी घरात त्यांची केली आणि आत्महत्या भासवण्यासाठी सातव्या मजल्यावरुन मृतदेह खाली फेकला. मात्र ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी मायलेकाला अटक केली आहे. हत्या प्रकरणी आंबोली पोलिसांनी मायलेका विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. (All five accused in Nashik youth attack case remanded in police custody for 3 days)

इतर बातम्या

Nagpur Police | मालकाच्या नावाचा बनावट मेल; पैसे तिसऱ्याला पाठवायला सांगितले, फेक अकाउंट निघाल्याने अडचण

Transfer Demand : बदली मागणे हा काही सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क नाही; उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.