AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कथित धर्मांतरण प्रकरणः नाशिकचा कुणाल उच्चशिक्षित, रशियात एम. डी. मेडिसीन केले पूर्ण; वडील होते लष्करी सेवेत

उत्तर प्रदेशात बहुचर्चित असणाऱ्या कथित धर्मांतरण प्रकरणी अटकेत असलेला नाशिकचा कुणाल ऊर्फ आतिफ उच्चशिक्षित असून त्याने चक्क रशियात जावून डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केल्याचे समोर येत आहे.

कथित धर्मांतरण प्रकरणः नाशिकचा कुणाल उच्चशिक्षित, रशियात एम. डी. मेडिसीन केले पूर्ण; वडील होते लष्करी सेवेत
कथित धर्मांतर प्रकरणात नाशिकमधून कुणाल उर्फ आतिफला अटक.
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 11:56 AM

नाशिकः उत्तर प्रदेशात बहुचर्चित असणाऱ्या कथित धर्मांतरण प्रकरणी अटकेत असलेला नाशिकचा कुणाल ऊर्फ आतिफ उच्चशिक्षित असून त्याने चक्क रशियात जावून डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केल्याचे समोर येत आहे. (Alleged conversion case: Kunal of Nashik highly educated, completed medical education in Russia)

उत्तर प्रदेशमधील कथित धर्मांतर प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने नाशिकरोडच्या आनंदनगर भागातून कुणाल उर्फ आतिफ चौधरी नावाच्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. आतिफ हा कुणाल या नावाने नाशिकमध्ये वास्तव्याला होता. उत्तर भारतातील कथित धर्मांतर प्रकरण गंभीर आहे. उत्तर प्रदेश मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जवळपास 1 हजार लोकांना धर्मांतरित करण्यात आल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेला कुणाल उर्फ आतिफ उच्चशिक्षित आहे. त्याने चक्क रशियात जावून एम. डी. मेडिसीनचे शिक्षण घेतलेय. त्याचे वडील लष्करी सेवेत होते. ते 1998 साली देवळाली कॅम्पमधून निवृत्त झाले आहेत. त्यापूर्वी ते हरियाा येथील अंबालात होते. तिथेच कुणालचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर देवळातील्या इंग्रजी कॉन्व्हेट शाळेतून दहावी उत्तीर्ण झाला. नाशिकमधील कॉलेजरोड भागातल्या कॉलेजमध्ये बारावी पूर्ण केली. त्यानंतर पुढील सहा वर्षे म्हणजे 2006 ते 2012 या काळात तो रशियात उच्चशिक्षणासाठी गेला. तिथे त्याने सेंट पीटर्सबर्गमध्ये डॉक्टरकीचे एम.डी. मेडिसीनचे शिक्षण पूर्ण केले, पण तो एमएफजीई परीक्षा पास झाला नाही. त्यामुळे त्याला डॉक्टरकीची प्रॅक्टीस करता येत नव्हती. सध्या या परीक्षेच्याच तो तयारीत होता. आता त्याच्या अटकेने त्याच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. आपला मुलगा असे काही करू शकतो, यावरच त्याच्या आई-वडिलांचा विश्वासच नाही.

खात्यात 20 कोटी आले कुठून?

कुणाल उर्फ आतिफच्या खात्यात चक्क 20 कोटी रुपये जमा केले गेल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कथित धर्मांतर करण्यासाठी हा निधी गोळा केल्याचा आरोप होत आहे. कुवैतसह जगभरातल्या इतर देशांमधून कुणालच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली होती. आता हा निधी कोणाकोणाच्या खात्यातून पाठवण्यात आला आहे. त्यांची यादी तयार करून या व्यक्ती कोण आहेत, याची झाडाझडतीही घेण्यात येणार आहे. सोबतच हा निधी फक्त धर्मांतरणासाठी वापरायचा होती की, इतर काही कारवायांसाठी. याचा तपासही दहशतवादी विरोधी पथकाने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आतापर्यंत 12 जणांना बेड्या

उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने देशाच्या वेगवेगळ्या भागातून जवळपास 12 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यातले अनेक जण वेगवेगळ्या विश्वस्थ संस्था म्हणजेच ट्रस्ट चालवायचे. या ट्रस्टसाठी जगभरातून फंडिंग सुरू होती. या निधीचा कथित धर्मांतरणासाठी वापर केला जात होता. यातला एक जण जसा नाशिकमध्ये नाव बदलून राहिला होता, तसेच इतरही अनेकजण आपली ओळख लपवून रहात असल्याचे समोर येत आहे. (Alleged conversion case: Kunal of Nashik highly educated, completed medical education in Russia)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये पहाटेपासून पावसाची झडझिंबड!

मतदार यादीतून नाशिकमध्ये 73 हजार नावे वगळली, पण तब्बल 2 लाख 87 हजार दुबार नावांचे काय?

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....