Nashik Crime : जुना वाद उफाळून आला, भररस्त्यात टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

नाशिकमध्ये हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जुने वाद उफाळून आल्याने किंवा अन्य कारणातून भररस्त्यात हल्ले करण्याच्या घटना वाढल्या आहेतय

Nashik Crime : जुना वाद उफाळून आला, भररस्त्यात टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला
जुन्या वादातून तरुणावर हल्लाImage Credit source: nashik youth attack
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 9:46 AM

नाशिक / 7 ऑगस्ट 2023 : जुन्या भांडणाची कुरापत काढून भररस्त्यात तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना नाशिकमध्ये काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे. म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतील म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोड वरील चाणक्यपुरी परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गौरव थोरात असे जखमी तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरु केला आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्यात गाठत तरुणावर जीवघेणा हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव थोरात याचा संशयित आरोपी गणेश धात्रक याच्याशी काही कारणातून जुना वाद होता. या वादातून काल सायंकाळी सातच्या सुमारास म्हसरुळ-मखमलाबाद लिंक रोडवरील चाणक्यपुरी परिसरात गौरवला गाठले. गणेश आणि त्याच्या साथीदारांनी धारदार हत्यारांनी गौरववर हल्ला केला. यात गौरव गंभीर जखमी अवस्थेत जागीच कोसळला. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु

उपस्थित नागरिकांनी म्हसरुळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी गौरवला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर घटनास्थळाचा तपास सुरु केला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपी आणि पीडितामध्ये नक्की कोणता वाद होता, याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस तपासानंतरच आरोपी आणि पीडितामध्ये नक्की काय वाद आहे हे उघड होईल.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.