Malegaon Doctor Attack : मालेगावमध्ये डॉक्टरवर धारदार कटरने हल्ल्याचा प्रयत्न, सुदैवाने कोणतीही इजा नाही
मालेगाव सामान्य रुग्णालयात आपत्कालीन विभागात डॉ.पोद्दार हे कार्यरत आहेत. आज एक व्यक्ती रुग्णालयात आला. त्याने डॉ. पोद्दार यांना हातातील काम सोडून आपल्यावर उपचार करण्यास सांगितले. मात्र डॉक्टरांनी तसे न केल्याने त्या व्यक्तीने धारदार कटरने त्यांच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टर वेळीच सावध झाल्याने ते बचावले.
मालेगाव : मालेगाव सामान्य रुग्णालयात डॉक्टर (Doctor)वर एका व्यक्तीने धारदार कटरने हल्ला (Attack) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने डॉक्टर वेळीच सावध झाल्याने कोणतीही इजा झाली नाही. डॉ. पोद्दार असे हल्ला करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव सामान्य रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि सर्व डॉक्टर संपावर गेले असून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन (Protest) सुरु आहे. डॉक्टरने हातातील काम सोडून माझ्यावर तातडीने उपचार केला नाही म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी मालेगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांनी संबंधित आरोपीस ताब्यात घेतले आहे. आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत सामान्य रुग्णालय येथे आला होता.
हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन
मालेगाव सामान्य रुग्णालयात आपत्कालीन विभागात डॉ.पोद्दार हे कार्यरत आहेत. आज एक व्यक्ती रुग्णालयात आला. त्याने डॉ. पोद्दार यांना हातातील काम सोडून आपल्यावर उपचार करण्यास सांगितले. मात्र डॉक्टरांनी तसे न केल्याने त्या व्यक्तीने धारदार कटरने त्यांच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टर वेळीच सावध झाल्याने ते बचावले. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून मालेगाव सामान्य रुग्णालय येथे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. डॉक्टरांवर झालेला हल्ला हा निंदनीय आसून त्या बाबतीत गंभीरता लक्षात घेत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आपत्कालीन वार्डमधील इंचार्जवर हल्ला केला असून तातडीने रुग्णालयात कायमस्वरूपी पोलीस चौकी झाली पाहिजे अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकारच्या घटना बहुदा होत असल्याने होत असता यावर तातडीने कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. (Attempt to attack doctor with sharp cutter in Malegaon Civil Hospital)