धुळे हादरलं! गुप्तांगात एअर प्रेशर पंप घुसवला, हवेच्या दाबाने कर्मचारी ठार

कर्मचाऱ्याने 28 वर्षीय सहकर्मचाऱ्यासोबत केलं घृणास्पद कृत्य! धुळ्यातील धक्कादायक घटनेमागील सत्य काय?

धुळे हादरलं! गुप्तांगात एअर प्रेशर पंप घुसवला, हवेच्या दाबाने कर्मचारी ठार
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 10:37 AM

धुळे : एका व्यक्तीने आपल्या सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत घृणास्पद कृत्य करत त्याची हत्या केला. कर्मचाऱ्याने एका व्यक्तीच्या गुप्तांगात एअर पंप घुसवला. यामुळे 20 वर्षीय तरुणाचा हवेच्या दाबामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी असलेल्या सहकर्मचाऱ्याला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. आता आरोपीची कसून चौकशी केली जाते आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एका खासगी कंपनीत हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. हत्या करण्यात आलेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव तुषार निकुंभ असं आहे.

तुषार सदाशिव निकुंब नावाचा तरुण एका खासही कंपनीत कामाला होता. ही कंपनी इंटिग्रेटेड इंजिनिअरींग सेवा पुरवते. या कंपनीत काम करणारे कर्मचारी आपल्या कपड्यांवर लागलेली धुळू हटवण्यासाठी एअर प्रेशर पंपाचा उपयोग करायचे. दरम्यान, एक दिवस कामानंतर धूळ हटवत असताना एका कर्मचाऱ्याने तुषारला पकडलं आणि त्याच्या गुत्पांगात एअर पंपचा नोजल घुसवा.

यामुळे तुषारच्या शरीरातील आतल्या भागाचं गंभीर जखमा झाला. हवेच्या दाबाने त्याच्या शरीरातील आतील अवयवांना गंभीर स्वरुपाचा मार लागून त्याचा मृत्यू झाला. तुषारला नंदुरबार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पण त्याची प्रकृती अधिक गंभीर होत चालल्यानं अखेर त्याला सूरत येथील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी घेऊन जाण्यात आलं. पण तिथे त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. अखेर त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, ज्या व्यक्तीने तुषारच्या गुत्पांगात एअर पंप घुसवला होता, त्याला अटक करण्यात आली आहे. तुषारची हत्या केल्याप्रकरणी तुषारच्या सहकर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

तुषारच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली आहे. घरातील तरुण मुलाच्या मृत्यूने त्याचे कुटुंबीय हादरुन गेले आहेत. तुषारच्या मारेकऱ्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत तुषारच्या नातलगांनी केली आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा तिथं कोण कोण होतं, नेमकं हे कृत्य सहकर्मचाऱ्याने तुषारसोबत का केलं? याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.

Non Stop LIVE Update
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.