Dhule Murder : धुळे हादरलं! गोळीबार करत तरुणाचा खून, दोघा संशयितांना अटक, तपास सुरु

या हत्येमुळे एकच खळबळ धुळे शहरात पसरली आहे. मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली.

Dhule Murder : धुळे हादरलं! गोळीबार करत तरुणाचा खून, दोघा संशयितांना अटक, तपास सुरु
धुळ्यात हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 10:31 AM

धुळे : धुळे शहर तरुणाच्या हत्येनं (Dhule Murder News) हादरलं आहे. धुळे शहरातली कुमार नगर परिसरात गोळीबार (Dhule crime news) करत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या गोळीबारामध्ये चिनू उर्फ चंद्र राजेंद्र पोपली हा तरुण ठार झाला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या हत्येमुळे एकच खळबळ धुळे शहरात पसरली आहे. मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबार प्रकरणी धुळे पोलिसांनीही दोघांवर कारवाई केलीय. दोघा संशयितांना पोलिसांनी (Dhule Police) ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी धुळे पोलीस करत आहेत. मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. संशयित आरोपींच्या चौकशीतून आता नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय.

नेमकं काय घडलंं?

शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेनंतर आता पोलिसांकडून हत्याप्रकरणाचा कसून तपास केला जातो आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पवन नावाच्या व्यक्तीने या हत्येबाबत माहिती दिली आहे. पवन हा हत्या झाली तेव्हा घटनास्थळी होता. त्याने ही संपूर्ण घटना पाहिली असून या हत्याकांडाच्या घटनाक्रमाबाबत त्याने सविस्तर माहिती पोलिसांनी दिलीय.

वहिनींसोबत तिघांनी अभद्र भाषेत बाचतीत केली होती. चिनूवर हल्ला करण्याआधी तिघे हल्लेघोर घरी गेले होते. आम्ही सगळे चौकत येऊन बसलो होतो.त्यावेळी तिघांनी येऊन हल्ला केला. त्याआधी तिघांनी तरुणाच्या घरावरही धडक दिल्याचं कळतं. तिथं काही सापडलं नाही म्हणून तिघा हल्लेखोरांनी येऊन विचारणा केली, असं पवन या तरुणानं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

आधी बाचाबाची झाली. मग मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर देसी कट्टा काढला आणि गोळी झाडून चिनूचा खून केला. या नंतर जखमी झालेल्या चिनूला घेऊन आम्ही सिव्हिल रुग्णालयात गेलो. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती पवनने दिलीये.

तपास सुरु

आता धुळे पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी आणि हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे जबाब नोंदवले असून हत्येचा गुन्हा नोंदवून घेतला आहे. शिवाय दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जातेय. आता या हत्याकांडाचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....