VIDEO | दोन कॉलेज युवतींची फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींच्या झिंज्या ओढल्या

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजच्या कॅम्पसमधील ही घटना घडली आहे. दोन मुलींमध्ये फ्रिस्टाईल तुफान हाणामारी झाली. विशेष म्हणजे या दोन्ही मुलींची कॉलेजच्या युनिफॉर्मवर सुरू असलेली हाणामारी सोडवण्या ऐवजी बघ्यांचीच गर्दी परिसरात झाली होती.

VIDEO | दोन कॉलेज युवतींची फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींच्या झिंज्या ओढल्या
दोन कॉलेज युवतींची फ्री स्टाईल हाणामारी
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 5:27 PM

नाशिक : कोरोना महामारीमुळे दिड वर्षे ठप्प राहिलेली शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. शाळा-महाविद्यालये बंद राहिल्याने त्याचा मुलांवर विपरित परिणाम झाल्याचे बोलले जात आहेत. नाशिकच्या एका कॉलेजच्या आवारात घडलेल्या प्रकाराने याचीच प्रचिती आली आहे. दोन महाविद्यालयीन मुलींमध्ये किरकोळ कारणावरून झालेला वाद इतका भडकला की दोघींनी सर्वांदेखतच फ्री स्टाईल हाणामारी सुरू केली. दोघांच्या संतापाला पारावार न उरल्याने दोघींनी एकमेकींच्या झिंज्या ओढल्या. त्यांच्या या झुंजीचा व्हिडीओ सोशल मिडीयात प्रचंड वेगाने व्हायरल झाला असून याबाबत विविध चर्चांना ऊत आला आहे.

वाद नेमका कुठे व कशावरुन झाला?

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजच्या कॅम्पसमधील ही घटना घडली आहे. दोन मुलींमध्ये फ्रिस्टाईल तुफान हाणामारी झाली. विशेष म्हणजे या दोन्ही मुलींची कॉलेजच्या युनिफॉर्मवर सुरू असलेली हाणामारी सोडवण्या ऐवजी बघ्यांचीच गर्दी परिसरात झाली होती. काही मिनिटे त्यांची हाणामारी चालू राहिली. तिथल्या बघ्यांनी हाणामारीचा व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरे पुढे सरसावले. पण हाणामारी सोडवण्यासाठी रहिवाशांपैकी कुणीच पुढे आले नाही. शेवटी काॅलेजमधील काही मुलींनीच पुढे येऊन दोघींमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

कॉलेज प्रशासनाचे दुर्लक्ष उघडकीस

कॉलेज कॅम्पसमध्ये घडलेल्या या हाणामारीने युवक युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन तरुणांमध्ये सगळ्यांच्या समक्ष झालेल्या हाणामारीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या निमित्ताने या कॉलेजमध्ये असलेली सुरक्षा व्यवस्था आणि कॉलेज प्रशासन या गोष्टींकडे कसे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. याबाबत पालकांनी कॉलेज व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारावर नाराजीचा सूर आळवला आहे. (Freestyle fight between two college girls in Nashik)

इतर बातम्या

Pune crime | पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; चाकण पोलीस स्थानकात ८५ हजारांची लाच घेताना एकाला रंगेहात पकडले

Satara Crime : साताऱ्यात दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार करुन खून, काही तासांत आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.