अपघात सत्र थांबेना! आयशर कंटेनरची एकमेकांना धडक, 1 ठार, तब्बल 2 तासांनी अपघातग्रस्त टेम्पोत अडकेल्याची सुटका

Igatpuri Accident : मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरीजवळ सलग दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. गेल्या 48 तासांत झालेला हा दुसरा अपघात असून पहाटेच्या सुमारासच हा अपघात घडलीय.

अपघात सत्र थांबेना! आयशर कंटेनरची एकमेकांना धडक, 1 ठार, तब्बल 2 तासांनी अपघातग्रस्त टेम्पोत अडकेल्याची सुटका
नंदुरबारमध्ये चरणमाळ घाटात लक्झरीला भीषण अपघात
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 12:57 PM

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) अपघातांची मालिका (Nashik Accident News) काही थांबायचं नाव घेत नाहीये. आज सकाळी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला. आयशर टेम्पोने (Eicher tempo) कंटेरनला जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला. विशेष म्हणजे या अपघातानंतर अपघातग्रस्त आयशर टेम्पोमध्ये दोघे अडकून पडले होते. त्या दोघांनाही अथक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आलं. दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोघांची अपघातग्रस्त आयशर टेम्पोतून सुटका करण्यात आली. यातील गंभीर जखमी रुग्णाला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर बाहेर काढण्यात आलेल्या आणखी एकाचा आधीच मृत्यू झाला होता टोलनाक्यावर असलेल्या रुग्णवाहिकेच्या ज्ञानेश्वर पासलकर यांनी जखमीला तातडीने रुग्णालयात पोहोचवल्यानं त्याचा जीव वाचलाय. सध्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणावर जखमीवर उपचार सुरु आहेत.

ऑन द स्पॉट मृत्यू

शनिवारी पहाटेच्या सुमाराला आयशर टेम्पोने कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की 1 जण जागीच ठार झाला. तर 1 जण गंभीर जखमी झाला. हे दोघेही आयशरमध्ये अडकलेले होते. त्यांना 2 तासांच्या अथक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावपथकाने लगेचच अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली.

क्लिनर वाचला..

MH 20 AL 3977 ह्या क्रमांकाच्या आयशर टेम्पोने HR 46 E 1716 या कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये संजीव कुमार (वय 22 रा. फिरोजाबाद उत्तरप्रदेश) हा जागीच ठार झाला. तर क्लिनर गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. महामार्ग पोलीस केंद्र घोटी कर्मचारी गुजरे, पाटोळे, निंबेकर,जाधव, कापसे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, विजय रुद्रे, ए. एस. बोराडे,आपत्ती व्यवस्थापन टीमचे देवा वाघ, जस्सी भाई, रूट पेट्रोलिंग टीम यांनी मदतकार्य केले.

हे सुद्धा वाचा

अपघातांची मालिका

दरम्यान, मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरीजवळ सलग दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. गेल्या 48 तासांत झालेला हा दुसरा अपघात असून पहाटेच्या सुमारासच हा अपघात घडलीय. शुक्रवारी पहाटे एक भरधाव महिंद्रा थारही मागून एका कंटेनरमध्ये घुसली होती. यात महिंद्रा थार या गाडीचा चक्काचूर झाला होता. तर कारामधील चार पैकी एक जण ठार झाला होता. तर तिघे गंभीर जखमी झाले होते. महिंद्रा थार कारमधील चालकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला होता. तर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातातही चालकाचाच मृत्यू झालाय. या वाढत्या अपघातांनी चिंता वाढवली असून काळजी व्यक्त केली जातेय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.