Manmad Death : मनमाडमध्ये डोंगरावरून जेसीबी खाली पडून चालकाचा जागीच झाला मृत्यू

अनकवाडे गावातील खडी क्रेशरसाठी डोंगरावरून दगड काढण्याचे काम सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यावर डोंगरावरून दगड काढणे शक्य होणार नसल्याने आता डोंगरावरून दगड काढण्याचे काम सुरू होते. खडी क्रशरसाठी डोंगरावरून दगड काढत असताना दगड निखळला आणि एक जेसीबी खाली पडून चालकाचा जागीच मृत्यू झाला.

Manmad Death : मनमाडमध्ये डोंगरावरून जेसीबी खाली पडून चालकाचा जागीच झाला मृत्यू
मनमाडमध्ये डोंगरावरून जेसीबी खाली पडून चालकाचा जागीच झाला मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 9:09 PM

मनमाड : डोंगरावरुन दगड काढण्याचे काम सुरु असताना दुर्घटना घडून जेसीबी (JCB) डोंगरावरुन खाली कोसळून (Collapse) चालकाचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे. रोहित चव्हाण असे मयत जेसीबी चालकाचे नाव आहे. मनमाडपासून 8 किलोमीटर अंतरावर अनकवाडे गाव आहे. या गावात खडी क्रशरसाठी दगड काढण्याचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच एक निखळला आणि त्याच्या धक्क्याने जेसीबी डोंगरावरुन खाली कोसळला. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अनकवाडे गावावर शोककळा पसरली आहे.

जखमी चालकाला रुग्णालयात नेले असता मृत घोषित केले

अनकवाडे गावातील खडी क्रेशरसाठी डोंगरावरून दगड काढण्याचे काम सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यावर डोंगरावरून दगड काढणे शक्य होणार नसल्याने आता डोंगरावरून दगड काढण्याचे काम सुरू होते. खडी क्रशरसाठी डोंगरावरून दगड काढत असताना दगड निखळला आणि एक जेसीबी खाली पडून चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर प्राथमिक उपचारासाठी खदाणीच्या इतर कामगारांनी जखमी असलेल्या रोहित चव्हाण याला प्राथमिक उपचारासाठी मनमाडच्या प्राथमिक रूग्णालय येथे नेले. मात्र डॉक्टरांनी रोहितला मृत घोषित केलं.

कोल्हापूरमध्ये चालकाचा ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली

कोल्हापूर शहरातील पुईखडी येथे चालकाचा ताबा सुटून इनोव्हा कार दरीत पलटी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इनोवा कारमधील शुभम सोनार आणि शंतनू कुलकर्णी यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. वाशी येथील फार्महाउसवरून जेवण करून परतत असताना ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर सौरभ रवींद्र कणसे आणि संकेत बाळकृष्ण कडणे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (In Manmad JCB fell down a hill and the driver died on the spot)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.