Nashik Crime : धक्कादायक ! शेतीच्या वादातून शेतकऱ्याला जिंवत जाळले, चौघांविरोधात तक्रार दाखल
रविवारी गायकवाड यांच्या शेतात शेजाऱ्याने नांगरटी केली. यामुळे आपल्या शेतात नांगरटी का केली याचा जाब विचारण्यास गेलेल्या गायकवाड यांचा शेजारील जमीनधारकातील भागीनाथ हिंगे, निलेश, हिंगे, किरण हिंगे आणि संग्राम मेंगाळ यांच्याशी वाद झाला.
येवला : शेतीच्या वादा (Dispute)तून एका शेतकऱ्याला जिवंत जाळल्या (Burn)ची धक्कादायक घटना येवला तालुक्यातील घडली आहे. दिलीप गायकवाड (55) असे जाळण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी जखमी गायकवाड यांच्या मुलाच्या तक्रारीवरुन येवला तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी पीडिताचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. जबाब नोंदवल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल. या घटनेत गायकवाड हे 40 टक्के भाजले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. (In Yeola a farmer was burnt alive due to an agricultural dispute)
शेतीच्या वादातून चौघांनी शेतकऱ्याला जाळले
दिलीप गायकवाड हे येवला तालुक्यातील कुसूर गावात आपल्या कुटुंबासोबत राहतात. गायकवाड यांच्या शेतीच्या बाजूलाच असलेल्या शेतमालकासोबत गायकवाड यांचा वाद होता. रविवारी गायकवाड यांच्या शेतात शेजाऱ्याने नांगरटी केली. यामुळे आपल्या शेतात नांगरटी का केली याचा जाब विचारण्यास गेलेल्या गायकवाड यांचा शेजारील जमीनधारकातील चौघांविरोधात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, या चार जणांनी मिळून गायकवाड यांना जाळले. यात ते 40 टक्के भाजले. गायकवाड यांचा मुलगा नितीन गायकवाड याने यासंदर्भात चार जणांविरुद्ध येवला पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिस पुढीत तपास करीत आहेत. (In Yeola a farmer was burnt alive due to an agricultural dispute)