एअर इंडियाच्या सिनिअर पायलटचा करुण अंत, गॅस गिझर गळतीने बाथरुममध्येच गमावले प्राण

रश्मी गायधनी या मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे बाथरुममध्ये गुदमरुन गायधनी यांचा करुण अंत झाला.

एअर इंडियाच्या सिनिअर पायलटचा करुण अंत, गॅस गिझर गळतीने बाथरुममध्येच गमावले प्राण
रश्मी गायधनी
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 9:02 AM

नाशिक : गॅस गिझरच्या गळतीमुळे पायलट महिलेला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना (Nashik Pilot Lady Death) समोर आली आहे. गॅस गिझरमधून वायू गळती (Gas Geyser leakage) झाल्यामुळे महिलेचा गुदमरुन मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रश्मी गायधनी (Rashmi Gaidhani) या मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. रश्मी गायधनी एअर इंडियामध्ये सिनिअर पायलट म्हणजेच ज्येष्ठ वैमानिक होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे बाथरुममध्येच गुदमरुन गायधनी यांचा करुण अंत झाला.

नेमकं काय घडलं?

गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे महिला पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला. रश्मी गायधनी या मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. आंघोळीच्या वेळी बाथरुममधील गॅस गिझरमधून गळती झाली. त्यामुळे गुदमरुन रश्मी गायधनी यांना जागीच प्राण गमवावे लागले. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गॅस गिझर गळतीच्या घटना

याआधी, कर्नाटकातील बंगळुरुमध्ये 35 वर्षीय महिला आणि तिच्या 7 वर्षांच्या मुलीचा गॅस गिझरमधून विषारी वायू गळतीमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. गॅस गिझर गेल्या काही काळापासून अनेक जणांकडे वापरात आहेत. सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या नियमित गिझरला ते पर्याय ठरतात. मात्र योग्य सुरक्षा राखली गेली नाही तर ते वापरणे थोडे धोकादायक आणि प्राणघातक देखील ठरु शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

संबंधित बातम्या :

लग्नाची तारीख ठरवून गावी निघाले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! तिघे ठार

अपघाताचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळणार नाही की चूक कोणाची?

दोघींसोबत रिलेशनशीपमध्ये, वादावादीतून एकीची समुद्रात उडी, गर्लफ्रेण्डला वाचवताना तरुणाचा बुडून मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.