Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैत्रिणी फिरवण्यासाठी 56 सोनसाखळ्या चोरी, नाशकात दोन उच्चशिक्षित तरुणांना अटक

तुषार बाळासाहेब ढिकले, दंगल ऊर्फ उमेश अशोक पाटील असे सोनसाखळी चोरांची नावे आहेत. मैत्रिणींना फिरायला नेण्यासाठी तसेच रोलेट खेळण्यासाठी चेन स्नॅचिंग करत असल्याचा धक्कादायक खुलासा इंजिनिअर असलेल्या दोघा चोरांनी केला आहे

मैत्रिणी फिरवण्यासाठी 56 सोनसाखळ्या चोरी, नाशकात दोन उच्चशिक्षित तरुणांना अटक
नाशकात दोघा सोनसाखळी चोरांना अटक
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 9:31 AM

नाशिक : आपल्या मैत्रिणीला फिरायला घेऊन जाण्यासाठी तब्बल 56 चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरी केलेलं सोनं या चोरट्यांकडून विकत घेणाऱ्या दोन सराफांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्ष पोलिसांना चकवा देणाऱ्या या आरोपींना पोलिसांनी अखेर जेरबंद केलं. सिनेस्टाईल पाठलाग करून नाशिक पोलिसांनी केलेल्या या दबंग कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.

काय आहे प्रकरण?

तीन वर्षांपासून सोनसाखळी चोरी करत लाखोंची माया गोळा करणाऱ्या दोन अभियंत्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभियंत्यांनी तीन वर्षात तब्बल 56 सोनसाखळी चोरी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. संशयितांच्या बँक खात्यात 20 लाख रुपयांची रक्कम, 48 लाखांचा फ्लॅट आणि कार घेतल्याचे तपासात समोर आले.

दोघा सराफांनाही अटक

चोरीचे सोने घेणाऱ्या दोघा सराफांना अटक करण्यात आली आहे. तुषार बाळासाहेब ढिकले, दंगल ऊर्फ उमेश अशोक पाटील असे सोनसाखळी चोरांची नावे आहेत. मैत्रिणींना फिरायला नेण्यासाठी तसेच रोलेट खेळण्यासाठी चेन स्नॅचिंग करत असल्याचा धक्कादायक खुलासा इंजिनिअर असलेल्या दोघा चोरांनी केला आहे

तीन वर्षांत या आरोपींकडून अनेक गुन्हे उघड झाले आहेत. अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. यापैकी आडगाव – 2, म्हसरूळ – 3, पंचवटी – 4, सरकारवाडा – 4, मुंबई नाका – 9, भद्रकाली- 4, गंगापूर – 6, अंबड – 7, इंदिरानगर – 10, उपनगर – 7 पोलीस ठाण्यांमध्ये या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत.

बँकेत 20 लाख, 48 लाखांचा फ्लॅट

संशयित दंगल पाटील याच्या बँकेत 20 लाखांची रक्कम, 48 लाखांचा फ्लॅट आणि कार अशी मालमत्ता तीन वर्षांत जमा केली असल्याचे निष्पन्न झाले. पाटील आणि ढिकले या दोघांनी ओझर येथे कार चालकाला मारहाण करत कार चोरी केल्याचे तपासात समोर आले.

दरम्यान, संशयित दंगल ऊर्फ उमेश पाटील हा सोनसाखळी चोरी करताना टी शर्टवर वेगवेगळ्या रंगाचे तीन जॅकेट परिधान करत असे. पाठीवरील बॅगेत बोगस नंबर प्लेट, तीन रंगाचे कापडी मास्क ठेवत असे. संशयितांच्या जयभवानी रोड येथील घर झडतीमध्ये 2 लाख 50 हजारांच्या 27 सोनसाखळ्या जप्त करण्यात आल्या.

27 सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत

हे दोघेही संशयित आरोपी चोरी केलेला माल ज्या सराफ व्यवसायिकांना विकायचे, त्या दोन सराफ व्यवसायिकांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या या कारवाईतील हस्तगत केलेले तब्बल 27 सोन्याचे दागिने जसेच्या तसे मूळ मालकांना परत देण्यात आले. ऐन दिवाळीच्या तोंडावर आपला चोरी गेलेला मला परत मिळाल्याने, नागरिकांनी देखील पोलिसांच्या कारवाईला शाबासकी दिली आहे.

संबंधित बातम्या :

नाकाबंदीत उडवाउडवीची उत्तरं, दरोडा टाकण्याच्या तयारीत नऊ जणांच्या टोळीला अटक

गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठी पोलिसांचं ऑपरेशन ऑल-आऊट, नागपूर पोलीस खरंच मच्छरांसारखं गुन्हेगारांचा नायनाट करणार?

29 लाखांचे अवैध बायोडिझेल जप्त; नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.