Dr Suvarna Waje Murder | दुसऱ्या लग्नासाठी नवऱ्याने डॉ. सुवर्णा वाजेंचा काटा काढला? डिलीट करण्यासारखं चॅटिंगमध्ये काय?

डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महापालिकेच्या सिडको रुग्णालयात कार्यरत होत्या. 25 जानेवारी, मंगळवारी रात्री नाशिक-मुंबई महामार्गावर मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली होती.

Dr Suvarna Waje Murder | दुसऱ्या लग्नासाठी नवऱ्याने डॉ. सुवर्णा वाजेंचा काटा काढला? डिलीट करण्यासारखं चॅटिंगमध्ये काय?
नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांडाचे गूढ वाढतेच
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 6:38 AM

नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणाने (Dr Suvarna Waje Murder) नाशिक जिल्ह्यासह (Nashik Crime) अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. डॉ. सुवर्णा यांचा पती संदीप वाजे संशयित म्हणून अटकेत आहे. त्याला मागील आठवड्यात इगतपुरी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी ही पोलीस कोठडी संपल्याने संदीप वाजेला वाडीवऱ्हे पोलिसांनी इगतपुरी सत्र न्यायालयात (Igatpuri Sessions Court) हजर केले होते. सात दिवसांच्या पोलीस कोठडीत संदीप वाजेने जास्त प्रतिसाद न दिल्याने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी झाल्याने इगतपुरी न्यायालयाने संदीपच्या पोलिस कोठडीत सहा दिवसांची वाढ केली, अशी माहिती सरकारी वकील जयदेव रिके यांनी दिली. दुसरं लग्न करण्यासाठी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खूप मोठा अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महापालिकेच्या सिडको रुग्णालयात कार्यरत होत्या. 25 जानेवारी, मंगळवारी रात्री नाशिक-मुंबई महामार्गावर मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली होती. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ही हाडे डॉ सुवर्णा वाजेंचीच असल्याचे डीएनए अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.

सरकारी वकिलांनी काय सांगितलं?

यावेळी सरकारी वकील यांनी माहिती देताना सांगितले की, घटनास्थळी गाडीत चाकू मिळाला आहे. तो चाकू गाडीत ठेवण्याचा उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. डॉ. सुवर्णा वाजेंनी केलेले चॅटिंग मोबाईलमधून उडवण्यात आले आहे. संशयिताचा मोबाईल फॉरेन्सिक टीमकडे डाटा रिकव्हर करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. मोबाईलवरील चॅट का डिलीट केले, याचे उत्तर संशयित देत नाही. त्याच्या मोबाईलमध्ये डॉ. सुवर्णांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सापडला आहे. व्हिडीओमध्ये आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे शब्द वापरण्यात आले आहेत. आरोपीच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपीने दुसरे लग्न करण्या संदर्भात उल्लेख केलेला आहे. दुसरं लग्न करण्यासाठी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खूप मोठा अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढण्यात आल्याचा संशय आहे. पुढील सविस्तर तपासासाठी संदीप वाजे याची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती.

नेमकं काय घडलं?

डॉ. सुवर्णा वाजे बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. 25 जानेवारी मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ती हाडे आणि तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, हे तपासण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली होती. त्यात वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती.

शेवटचा फोन नवऱ्याला

डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली होती. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे 25 जानेवारी रोजी, मंगळवारी सायंकाळीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. यादिवशी बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा फोन पती संदीपलाच केल्याचे समोर आले आहेत. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली आणि मास्टरमाईंड असलेल्या संदीप वाजेलाच बेड्या ठोकल्या. आता त्याचे पाच साथीदारही पोलिसांच्या रडारवर आहेत.

संबंधित बातम्या :

डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांड; पतीच्या 3 मित्रांची चौकशी, पण शेवटचा मोहरा बाकी!

डॉ. सुवर्णा वाजेंसोबत घातपातच, डीएनए अहवालातून धक्कादायक माहिती

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.