नाशकात ITI चे सहसंचालक 5 लाखांची लाच घेताना अटक, 1 कोटी 61 लाखांची मालमत्ता जप्त
कोर्सेसच्या मंजुरीसाठी तक्रारदारांनी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागात अर्ज केला होता. मात्र अर्जात अनेक त्रुटी काढत जाधव यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.
नाशिक : आयटीआयच्या सहसंचालकांना 5 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या झडतीत तब्बल 1 कोटी 61 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशकात केलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
कोर्सेसच्या मंजुरीसाठी तक्रारदारांनी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागात अर्ज केला होता. मात्र अर्जात अनेक त्रुटी काढत जाधव यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.
छाप्यात एक कोटींची मालमत्ता जप्त
मुंबईतील वांद्रे खेरवाडी येथील शासकीय तंत्र निकेतन परिसरातील प्रादेशिक कार्यालयात एसीबीने छापा टाकला. छाप्यात 1 किलो 572 ग्रॅम वजनाची सोन्याची नाणे, सोन्याचे बिस्कीट आणि दागिने, 79 लाखांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली. 1 कोटी रुपयांच्या आसपास मौल्यवान वस्तू देखील छाप्यात सापडल्या आहेत.
संबंधित बातम्या :
डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेचा गळा चिरणारा सापडला, 23 वर्षीय एक्स बॉयफ्रेण्डकडून हल्ला
नांदेडमध्ये स्वस्त धान्य दुकानाची चौकशी चालू असतानाच तक्रारदाराची हत्या
कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी, पुणे सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा