साताऱ्यातील पैलवानांसह नाशिकच्या तरुणाचा केरळातील बँकेवर दरोडा, साडेसात किलो सोन्याची लूट

केरळ पोलिसांत एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे सोने चोरीस नेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा केरळ पोलिस महाराष्ट्रात तपासात करत असताना निखिल जोशी मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले.

साताऱ्यातील पैलवानांसह नाशिकच्या तरुणाचा केरळातील बँकेवर दरोडा, साडेसात किलो सोन्याची लूट
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 12:23 PM

सातारा : केरळ राज्यातील बँक दरोडा प्रकरणी चार जणांना साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. दरोडेखोरांनी तब्बल साडेसात किलो सोने चोरल्याचा आरोप आहे. केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत साताऱ्यातून चौघा जणांच्या मुसक्या आवळल्या. मुख्य सूत्रधार मूळ नाशिकचा रहिवासी असून साताऱ्यातील तीन पैलवानांच्या साथीने त्याने हा दरोडा घातल्याची माहिती आहे.

केरळ राज्यातील एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे साडेसात किलो सोने चोरल्याच्या गुन्ह्यात केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार जणांना साताऱ्यातून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांना केरळ येथे नेण्यात आले आहे. निखिल जोशी (रा. नाशिक), सचिन शेलार, नवनाथ पाटील, अतुल धनवे (सर्व रा.सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. यातील निखिल जोशी केरळ चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर येत आहे.

कसा लागला शोध

केरळ पोलिसांत एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे सोने चोरीस नेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा केरळ पोलिस महाराष्ट्रात तपासात करत होते. तांत्रिक तपासात नाशिक येथील निक उर्फ निखिल जोशी या युवकाचा या गुन्ह्यात समावेश असून तोच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. केरळ पोलिसांच्या तपासात निखिल जोशी हा सध्या सातारा परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.

केरळ पोलिसांचे एक पथक त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी सातारा येथे दाखल झाले. त्यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन गुन्ह्याची माहिती दिली आणि संशयित सातारा परिसरात असल्याचे सांगितले. यानुसार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना केरळ पोलिसांना मदत करण्याचा सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी केरळ पोलिसांच्या मदतीला देण्यात आले.

पैलवान मित्रांसह मुख्य सूत्रधार सापडला

शोध घेताना संशयित आरोपी साताऱ्यात एका हॉटेलमध्ये आपल्या तीन साथीदारांसह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत नाशिक येथील मुख्य संशयित निखिल जोशी आणि त्याच्या सातारा-कोरेगाव येथील तीन पैलवान सचिन शेलार, नवनाथ पाटील, अतुल धनवे या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

साताऱ्यात प्राथमिक चौकशी करून त्या चौघांना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. केरळ पोलीस त्यांना घेऊन गेले असून ताब्यात घेतलेल्या नाशिकमधील निखिल जोशी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असला तरी साताऱ्यातील युवकांचा त्यात सहभाग किती आहे हे तपासात समोर येणार आहे.

संबंधित बातम्या :

Axis बँकेचा मॅनेजर, ICICI बँकेचा माजी मॅनेजर, तरीही दरोडा का टाकला?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.