पतीच्या उपचारासाठी आलेल्या विवाहितेचा हॉस्पिटलमध्ये विनयभंग, नाशकात खळबळ
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात विनयभंग आणि मुलींचं अपहरण होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. हॉस्पिटलमध्ये आपल्या पतीवर उपचार करण्यासाठी आलेल्या महिलेचा एका इसमाने विनयभंग केल्याचा आरोप आहे
नाशिक : नाशिक शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. हॉस्पिटलमध्ये आपल्या पतीवर उपचार करण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांकडून या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी विशेष महिला पोलीस पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात विनयभंग आणि मुलींचं अपहरण होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. हॉस्पिटलमध्ये आपल्या पतीवर उपचार करण्यासाठी आलेल्या महिलेचा एका इसमाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे अंबड परिसरात एका अल्पवयीन मुलीचे घरातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसाकडून मुलीचं अपहरण
पोलिसानेच अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. संशयित पोलीस दीपक जठार हा नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संशयिताने पीडित मुलीच्या घरच्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत अपहरण केल्याचा आरोप आहे. फूस लावून त्याने तिला पळवून नेल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई
नाशिक शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. पोलिसांकडून या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी विशेष महिला पोलीस पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात येत आहे.
मुंबईत अल्पवयीन मुलीचं अपहरण
दुसरीकडे, बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याची भेट करुन देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी मुंबईत समोर आला होता. या प्रकरणी 43 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं होतं. दादर जीआरपीने मोठ्या शिताफीने पीडितेला आरोपीच्या तावडीतून सुखरुप सोडवलं होतं. आरोपीचं नाव सुभान शेख होतं, त्याने फेसबुकवर पीडित तरुणीसोबत ओळख निर्माण केली होती.
आरोपीने फेसबुक अकाऊंटवर 20 वर्षीय तरुणाचे फोटो लावले होते. त्याचबरोबर त्याने आपल्या प्रोफाईलमध्ये मोठमोठ्या कलाकारांसोबतचे फोटोही शेअर केले होते. आरोपीने स्वत:ला इव्हेंट मॅनेजर असल्याचे सांगितले होते. त्याने मुलीला शाहरुख खानला भेटणार का? असं विचारलं असता मुलीने होकार दिला होता.
स्वतःला विशीतील तरुण भासवणाऱ्या 43 वर्षीय आरोपीने मुलीला फेसबुकवर मेसेज केला होता की, कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तो आपल्या वडिलांना रेल्वे स्टेशनवर तिला घेण्यासाठी पाठवत आहे. मात्र ओळख लपवणारा आरोपी स्वतःच तिला घेण्यासाठी दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचला. आरोपीने मुलीला भेटल्यानंतर तिच्या मोबाईलचं सीमकार्ड तोडलं. पण रेल्वे पोलिसांनी आरोपीला बरोबर हेरलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला त्याच्या तावडीतून सुखरुप सोडवलं आणि आरोपीला अटक केली.
संबंधित बातम्या :
चक्क पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण, नाशकात खळबळ
तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला अटक