कापडणीस पितापुत्र हायप्रोफाईल मर्डर, 36 वर्षीय शेजाऱ्याने मृतदेह नेण्यासाठी वापरलेली कार ताब्यात

माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा अमित कापडणीस नाशिक येथील शरणापूर रोडवरील आनंदी गोपाळ पार्कमध्ये रहायचे. अमित यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते, मात्र ते प्रॅक्टीस करायचे नाहीत. अमित यांच्यासोबत आनंदी गोपाळ पार्कमधील हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने मैत्री केली

कापडणीस पितापुत्र हायप्रोफाईल मर्डर, 36 वर्षीय शेजाऱ्याने मृतदेह नेण्यासाठी वापरलेली कार ताब्यात
डावीकडे आरोपी राहुल जगताप, नानासाहेब कापडणीस, अमित कापडणीस
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 10:35 AM

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब कापडणीस (वय 70 वर्ष) आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस (वय 35 वर्ष) या दोघांचा अतिशय थंड डोक्याने खून (Nashik Crime) केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या दुहेरी हत्याकांडातील (Double Murder) मुख्य संशयित आरोपी राहुल जगताप (वय 36 वर्ष) याच्याकडून त्याने मृतदेह नेण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ऑन द स्पॉट या कारचा पंचनामा देखील करण्यात आला आहे. पोलीस आता या हत्याकांड (Kapadnis Father Son Murder) प्रकरणी आणखी काही महत्त्वाची माहिती किंवा एखादी व्यक्ती समोर येते का? याचा तपास करत आहेत. गडगंज संपत्ती हडप करण्याच्या हेतूने जगतापने डॉ. अमितशी सलगी करुन दोघांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. नाशिकचे सरकारवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा अमित कापडणीस नाशिक येथील शरणापूर रोडवरील आनंदी गोपाळ पार्कमध्ये रहायचे. अमित यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते, मात्र ते प्रॅक्टीस करायचे नाहीत. अमित यांच्यासोबत आनंदी गोपाळ पार्कमधील हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने मैत्री केली. त्यानंतर अमितला व्यसनाधीन केले.

पालघरमध्ये पित्याचा खून, मुलाची भंडारदऱ्यात हत्या

डिसेंबरमध्ये नानासाहेब कापडणीस यांना गुंगीचे औषध देऊन शहराबाहेर नेले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा घाटात त्यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह दरीत फेकून दिला. तर अमितला भंडारदरा येथे फिरण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने शहराबाहेर नेत त्याचाही खून केला. त्याचा मृतदेह वाकी घाटात जाळून फेकून दिला. हे दोन्ही मृतदेह संबंधित भागातील पोलिसांना सापडले. मात्र, त्या दरम्यान जवळच्या पोलीस ठाण्यात कुठेही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती. त्यामुळे तपास रखडला.

खुनाचा उलगडा कसा झाला?

नानासाहेब कापडणीस यांची पत्नी आणि मुलगी या मुंबईत राहतात. त्यांची मुलगी शीतलने कापडणीस यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल राहुल जगतापकडे आढळला. त्या वडील आणि भावाला भेटायला नाशिकमध्ये आल्या. मात्र, तुमच्या घराचे काम सुरू आहे. त्यामुळे कापडणीस दुसऱ्या फ्लॅटमध्ये रहायला गेल्याची थाप राहुलने मारली. त्यामुळे मुलगी शीतल पुन्हा मुंबईला गेली. त्यानंतरही वडिलांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्या नाशिकला आल्या. त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांना राहुलवरच संशय आला. त्यांनी तपास केला असता खुनाला वाचा फुटली.

खुनानंतर रत्नागिरीत पार्टी

हॉटेल व्यावसायिक राहुलने पिता-पुत्राचा थंड डोक्याने मर्डर केल्यानंतर त्याचा आनंदोत्सव साजरा केला. आपले मित्र आणि हॉटेलमधील 22 सहकाऱ्यांना रत्नागिरीला नेत तिथे थर्टीफर्स्टची जोरदार पार्टी केली. कोकणच्या पर्यटनाचा आनंद लुटला. चार दिवस मौजमजा करून ते पुन्हा नाशिकला परतले. कापडणीस यांच्या कुटुंबापैकी दुसरे कोणीही नाशिकमध्ये नाही. त्यामुळे कापडणीस पिता-पुत्र कुठे गेले आहेत, हे कोणीही विचारले नाही. त्याने त्यांच्या मुलीलाही खोटे सांगून मुंबईला धाडले होते. त्यामुळे आता सारे काही निस्तरले आहे, अशा आविर्भावात राहुल रहात होता. मात्र, पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्याच.

हत्येचं कारण काय?

नाशिकमध्ये कापडणीस यांची प्रचंड संपत्ती आहे. पंडित कॉलनीमध्ये चार प्लॅट, सावरकरनगरमध्ये दोन मोठे बंगले, 97 लाखांचे शेअर्स ट्रेडिंग, 20 लाखांची मुदतपूर्ण ठेव, 30 लाखांची मुदतपूर्ण ठेव, देवळाली कॅम्पमध्ये टोलेजंग रो-हाऊस, नानावलीत 14 लाखांचा गाळा आहे. इतरही त्यांची अमाप संपत्ती आहे. शिवाय कापडणीस पिता-पुत्र दोघेच रहायचे. हे पाहून त्याने नियोजनपद्ध पद्धतीने त्यांचा खून करून संपत्ती हडपण्याचा डाव रचला. हत्याकांडानंतर राहुल जगतपाने त्यांच्या खात्यावरील मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यावर वर्ग केली. कापडणीस यांच्या खात्यातून शेअर्स विकस पैसा काढला. हे सारे रेकॉर्डवर होते. या आधारे पोलिसांनी राहुल जगतापला बेड्या ठोकल्या.

संबंधित बातम्या :

कुलसचिव पिता, डॉक्टर पुत्राचा मर्डर, मृतदेह पेटवून दरीत फेकले; खुनानंतर आनंदोत्सव, नाशिकमध्ये क्रूरतेचा कळस

सोफासेटमधील मृतदेहाचे गूढ उकलण्याच्या मार्गावर, संशयित आरोपी विवाहितेचा मित्र?

डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडात संशयित पती संदीपच्या मावसभावाला नाशिकमध्ये बेड्या, तपासावर प्रश्नचिन्ह, कारण…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.