CCTV | येवल्यात शोरुमचे पत्रे फोडून चोर शिरला, दीड लाखांच्या पैठण्यांची चोरी
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंगणगाव येथे नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावर असलेल्या राजमाता पैठणी शोरुममध्ये चोरी झाली. शोरुमच्या मागील बाजूचे पत्रे कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला
लासलगाव : पैठणीचे शोरुम फोडून चोरट्याने दीड लाखांच्या पैठणी आणि दहा हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील येवला शहराजवळ अंगणगाव येथे हा प्रकार घडला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंगणगाव येथे नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावर असलेल्या राजमाता पैठणी शोरुममध्ये चोरी झाली. शोरुमच्या मागील बाजूचे पत्रे कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर अंदाजे दीड लाख रुपये किमतीच्या महागड्या आणि दर्जेदार पैठण्या, तसेच गल्ल्यातील अंदाजे दहा हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला.
पैठणी व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण
ही घटना बुधवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली. चोरटा चोरी करत असतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गेल्या आठवड्यातच एका पैठणी दुकानात चोरी झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा पैठणीचे शोरूम फोडून चोरी केल्याने पैठणी व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरी प्रकरणी येवला शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या मदतीने चोराचा तपास येवला शहर पोलीस करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
खरी पैठणी साडी कशी ओळखायची? वाचा
VIDEO | पैठणीच्या पदरावर झोका घेणारे राधाकृष्ण, येवल्याच्या कुशल भावंडांची कारागिरी