Nashik CCTV | नाशकात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, लहान मुलावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
नाशिक : मोकाट कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला (Dogs Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात लहानगा गंभीर जखमी झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये (Sinnar Nashik) ही घटना घडल्याचं उघडकीस आली आहे. मोकाट कुत्र्यांनी चिमुरड्यावर केलेल्या हल्ल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चिमुकल्याचा जीव बचावला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं?
भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये ही घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज आज समोर आले आहे.
नागरिकांनी जीव वाचवला, रुग्णालयात उपचार सुरु
सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालय परिसरात कुत्र्यांनी मुलावर हल्ला चढवला. त्यानंतर काही नागरिकांनी मुलाचे प्राण वाचवले. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी झाल्याने त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाहा व्हिडीओ :
औरंगाबादेतही कुत्र्यांचा धुमाकूळ
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. नुकतंच औरंगाबादेत एका कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं होतं.
औरंगाबाद जिल्ह्यातील रांजणगावात शिवनेरी कॉलनीत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला होता. यामुळे या कॉलनीत राहणाऱ्या लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. या कॉलनीतील राहणाऱ्या एका लहान मुलाच्या पायाचा लचका कुत्र्यांनी तोडला. या कुत्र्याच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
चेन्नईतही कुत्रा चावला
दरम्यान, एका कुत्र्याने चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी चेन्नईत समोर आली होती. या हल्ल्यात 9 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. एक-दोनदा नव्हे तर तब्बल 16 वेळा हा कुत्रा मुलीला चावला होता. श्रीराम नगरमध्ये राहणारी ही मुलगी आपल्या घरातून बाहेर पडली होती. तेव्हा या कुत्र्याचीही मालकीणही आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला निघाली होती.
यावेळी हा कुत्रा आधी मुलीच्या मागे लागला. कुत्रा मागे लागल्याचं पाहून घाबरलेली मुलगी जीवाच्या आकांताने पळत सुटली. पण कुत्र्यासमोर तिची धाव तोकडी पडली आणि कुत्र्याने तिला गाठलंच. त्यामुळे तोल जाऊन ती पडली. नेमकी ती उठायच्या आतच कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. यावेळी कुत्र्याने तिचा 16 वेळा मुलीचा चावा घेतल्याची माहिती आहे.