Malegaon Accident : गॅस टँकर उलटला! गॅस गळतीनं तब्बल 2 हजार 300 कोंबड्या गुदमरुन दगावल्या

Malegaon Accident News : शनिवारी दुपारी घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये भरल्या जाणाऱ्या गॅसची वाहतूक करणारा टॅंकर पलटी झाला होता.

Malegaon Accident : गॅस टँकर उलटला! गॅस गळतीनं तब्बल 2 हजार 300 कोंबड्या गुदमरुन दगावल्या
दुर्दैवी घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 8:07 AM

मालेगाव : मालेगावच्या (Malegaon News) एका पॉल्ट्री फार्ममधील तब्बल दोन हजारपेक्षा जास्त कोंबड्या दगावल्या आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. या कोंबड्यांच्या मृत्यूचं कारण ठरलंय, गॅस टँकरचा अपघात (Gas Tanker Accident in Malegaon). मालेगावच्या (Malegaon Accident News) सौंदाणी शिवारामध्ये एक गॅस टँकर उलटला होता. गॅल टँकर उलटून गॅस गळती झाली. त्याचा फटका पोल्ट्री फार्ममधील बॉयलर कोंबड्यांना बसला. पोल्ट्री फॉर्ममधील तब्बल 2 हजार 300 कोंबड्यांचा गॅसगळीतीने गुदमरुन मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. शनिवारी गॅस टँकरचा अपघात झाला. गॅस टँकर उलटला होता. त्यानंतर रविवारी पोल्ट्री फार्मातील कोंबड्या अचानक मृत्युमुखी पडल्यानं निदर्शनास आलं. या हजारो कोंबड्यांचा मृत्यू अनाचक का झाला, असा प्रश्न पडला होता.

पोल्ट्री फार्ममध्ये गॅस घुसल्यानं कोंबड्या दगावल्या?

मालेगाव तालक्यातील सौंदाणे शिवारातील गॅस वाहतूक करणारा टॅंकर उलटला होता. यानंतर झालेल्या गॅस गळतीने जवळच असलेल्या पोल्ट्री फार्ममधील 2300 बॉयलर कोंबड्यांचा मृत्यू झाला. वातानुकूलित फार्ममध्ये गॅस घुसल्याने गुदमरुन कोंबड्या मृत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी टॅंकर अपघातानंतर रविवारी कोंबड्या मृत झाल्या. दरम्यान तालुका लघू पशू शल्य चिकित्सालय विभागाने मृत कोंबड्यांचे विच्छेदन करुन नमुने नाशिकच्या मेरी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती पशूधन विकास अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी दिली.

लाखोंचं नुकसान

शनिवारी दुपारी घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये भरल्या जाणाऱ्या गॅसची वाहतूक करणारा टॅंकर पलटी झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली. अपघातस्थळी हरिष आहिरे यांचा बॉयलर कोंबड्यांचा वातानुकूलित पोल्ट्री फार्म आहे. पोल्ट्रीमध्ये 10 हजार 200 लहान-मोठ्या कोंबड्या होत्या. गळती झालेला गॅस पोल्ट्रीत पसरल्याने कोंबड्या हळूहळू मरू लागल्या. रविवारी दिवसभरात तब्बल 2300 कोंबड्या मृत झाल्या.

हे सुद्धा वाचा

या घटनेची माहिती मिळाल्यानंतपर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी विच्छेदन केले असता मृत कोंबड्यांचे लिव्हर व फुफ्फुसे डॅमेज झाल्याचं आढळून आले. गॅस शरिरात गेल्याने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. या घटनेमुळे पोल्ट्री मालक आहिरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आता याबाबतचं खरं कारण समोर येईल.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.