Malegaon Firing : किरकोळ वादातून गोळीबार! मालेगावच्या अल्लामा पुलावर थरार, गुन्हा दाखल

Malegaon Crime News : याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून आता कारवाई काय होते, याकडे संपूर्ण मालेगावमधील जनतेचं लक्ष लागलंय.

Malegaon Firing : किरकोळ वादातून गोळीबार! मालेगावच्या अल्लामा पुलावर थरार, गुन्हा दाखल
मालेगावात खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 7:44 AM

मालेगाव : मालेगाव (Malegaon News) शहरात गोळीबाराच्या (Malegaon Firing News) घटनेनं खळबळ उडाली होती. दुचाकी विक्रीच्या व्यवहारातून वाद झाला. त्यातून एकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना मालेगाव शहराच्या (Malegaon crime) आल्लमा एकबाल पुलावर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करतायत. दुचाकीच्या व्यवहारातील 40 हजार रुपये मिळाले होते. तर अन्य 30 हजार रुपये एकाकडे बाकी होते. पैसे मागण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादातून एकाने बंदुकीने गोळीबार केली. सुदैवानं या गोळीबारातून तक्रारदार इसम बचावलाय. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या घटनेमुळे खुलेआम बंदुकीचा वापर होत असल्याचं अधोरेखित झालंय. पोलिसांच्या नाकावर टिच्चून बंदूक आणि गावठी कट्टे, तसंच धारदार हत्यारं वापरणाऱ्यांवर सवाही उपस्थित केले जात आहेत. यामुळे मालेगावातील गुन्हेगारीचं धगधगतं वास्तवही अधोरेखित झालंय.

मालेगावात गोळीबाराने खळबळ

आरफात नावाच्या इसमाच्या त्याच्या ताब्यातील बंदुकीने वकार नावाच्या व्यक्तीवर गोळी झाडली. वकार या तक्रारीतून थोडक्यात वाचलाय. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून आता कारवाई काय होते, याकडे संपूर्ण मालेगावमधील जनतेचं लक्ष लागलंय.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणात सर्रासपणे हत्यार वापरणे, गोळीबार करणे या घटना मालेगावात नेहमीच्याच झाल्या आहेत. गल्लीबोळात होणारी भांडण असो या मोबाइलवर झालेला वाद, यातून एकमेकांवर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुले नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हत्यारे, गावठी कट्टा वापरणाऱ्यांना पोलिसांचे भय नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

हे सुद्धा वाचा

मालेगाव शहरातील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचं गोळीबाराच्या घटनेनं अधोरेखित झालंय. मालेगाव शहरात किरकोळ कारणांवरुन झालेल्या भांडणात देखील गोळीबार सारख्या भीषण घटनेनं चिंता वाढवली आहे. शहरातील गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नसून शहरात सर्रासपणे गावठी कट्टे, हत्यारांचा वापर होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं बोललं जातंय.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.