नाशिकमधील वृद्ध शेतकरी हत्या प्रकरण, झारखंडमधून संशयिताच्या मुसक्या आवळल्या

आनंदवल्लीतील रमेश मंडलिक खून प्रकरणात आतापर्यंत एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी रमी राजपूत मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

नाशिकमधील वृद्ध शेतकरी हत्या प्रकरण, झारखंडमधून संशयिताच्या मुसक्या आवळल्या
नाशिकमधील आनंदवल्ली हत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 8:39 AM

नाशिक : आनंदवल्लीमधील वृद्ध शेतकरी रमेश मंडलिक हत्या प्रकरणात पसार असलेला संशयित नितेश सिंग पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने झारखंडमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. भूमाफियांनी सुपारी देऊन नाशिकमधील वृद्धाची हत्या केली होती. (Nashik Anandvalli Farmer Murder Case Accuse arrested from Jharkhand)

मुख्य आरोपी अद्याप पसार

आनंदवल्लीतील रमेश मंडलिक खून प्रकरणात आतापर्यंत एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी रमी राजपूत मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नाशिक शहर पोलीसांनी महाराष्ट्र संघटित कायद्यानुसार (मोक्का) गुन्हा दाखल करण्यास विशेष न्यायालयाने मान्यता दिली आहे.

धारदार शस्त्राने वार करुन हत्या

नाशिकमधील आनंदवल्ली भागात शेती असलेले वृद्ध शेतकरी रमेश मंडलिक यांची फेब्रुवारी महिन्यात धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. किरकोळ वादातून हा खून झाल्याचे भासवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मंडलिक यांची हत्या हा मोठ्या कटाचा भाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले.

नागपुरात तरुणावर धारदार शस्त्राने वार

दुसरीकडे, अनैतिक संबंधातून नागपुरात तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. आरोपीने तरुणाला नाल्यात उतरवून धारदार शस्त्राने वार केले. यावेळी त्याच्या रक्ताने नाल्याचे पाणी लालेलाल झाले. बघ्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला, मात्र कोणीही मदतीला न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आरोपी गोलू धोटेने मयत योगेश धोंगडेला बोलण्यासाठी नाग नाल्याजवळ बोलावलं होतं. यावेळी दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला, की गोलूने त्याला नाल्यात उतरवत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. पाण्यातच हल्ला झाल्यामुळे तरुणाच्या रक्ताने नाग नदीचं पात्र लालेलाल झाल्याचं पाहायला मिळालं. हत्येच्या थराराची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

समीर वानखेडेंची आणखी एक धडाकेबाज कामगिरी, थेट दाऊदच्या भावाला बेड्या

मुलगा मोठ्याने आवाज करतो, शेजाऱ्यांच्या तक्रारींमुळे मुंबईत महिलेची आत्महत्या, एकाला अटक

(Nashik Anandvalli Farmer Murder Case Accuse arrested from Jharkhand)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.