AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये प्रेम संबंधांतून तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार! हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, तिघांना अटक

Nashik attack on boy news : प्रवीण रावळा जाधव हा युवक घरी जेवण करत असताना तक्रारदार तरुणीचा भाऊ आणि दोघे साथीदार अशा एकूण तिघांनी प्रवीणवर हल्ला केला. धारदार शस्त्राने प्रवीणच्या हातावर आणि पोटावर वार केला

नाशिकमध्ये प्रेम संबंधांतून तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार! हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, तिघांना अटक
प्रेम संबंधातून तरुणावर जीवघेणा हल्ला?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 8:47 PM

नाशिक : प्रेमसंबंधातून तरुणाला जिवंत जाळण्याची घटना नाशिकमध्ये (Nashik Crime) ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशकात एका तरुणावर धारदार शस्त्रानं वार (Nashik attack on boy) करण्यात आले आहेत. या जीवघेण्या हल्ल्यात तरुण गंभीर जखणी झाला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पिंपळगावाच्या जवळ ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर येथे प्रेमसंबंधातून (Nashik Love affaire crime) तरुणाला जिवंत जाळण्यात आलं होतं. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. प्रवीण रावळा जाधव असं जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झालाय. या युवकावरही विनयभंग केल्याप्रकरणी तरुणीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नेमकं प्रकरण काय?

निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील नंदावननगर इथल्या एका तरुणीला धमकावलं होतं. प्रवीण रावळा जाधव या युवकाने 21 वर्षीय तरुणीच्या घरी सोमवारी रात्रीच्या सुमारास जाऊन गोंधळ घातला होता. ‘तुझ्या आईने माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. तुझ्या नातेवाईकांच्या विरोधात जातीवाचक गुन्हा दाखल करेन’ असा इशारा प्रवीणनं दिला होता.

इतकंच काय तर 21 वर्षीय तरुणीचे हात धरून लज्जास्पद कृत्य केल्याचाही आरोप करण्यात आला होते. पीडित मुलीच्या आई आणि भावास शिवीगाळ दमदाटी केल्याने तरुणीनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

कसा झाला हल्ला?

दरम्यान, प्रवीण रावळा जाधव हा युवक घरी जेवण करत असताना तक्रारदार तरुणीचा भाऊ आणि दोघे साथीदार अशा एकूण तिघांनी प्रवीणवर हल्ला केला. धारदार शस्त्राने प्रवीणच्या हातावर आणि पोटावर वार केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात प्रवीण गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या प्रवीणला लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचाराठी नेण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी प्रवीणला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यामुळे या तरुणाचा जीव थोडक्यात बचावलाय.

अधिक तपास सुरु!

या हल्ल्याप्रकरणी आता सीमा रावळा जाधव यांनी पोलिसांत तक्रा दिली आहे. प्रथमेश कैलास सरोदे, शुभम कैलास सरोदे आणि दीपक अजय नवले या तिघांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रवीणचे 21 वर्षीय तरुणीसोबत प्रेम संबंधाची असल्याकारणामुळे त्याला जीवे मारण्याची धमकी देत धारदार शस्त्राने हातावर आणि पोटावर वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर

संबंधित बातम्या :

Buldhana Suicide : बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गोशिंग शिवारातील घटना

Ambernath Lift Collapse : अंबरनाथमध्ये दुसऱ्या माळ्यावरून लिफ्ट कोसळून सात महिला जखमी, दोघींचे पाय मोडले

ED Raid : ते प्रकरण नेमकं काय ज्याच्यामुळे रश्मी ठाकरेंच्या भावाची ठाण्यातली संपत्ती जप्त करण्यात आलीय?

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.