प्रवासी साखर झोपेत, डिझेल टँक फुटून आगडोंब! काळीज चिरणाऱ्या किंकाळ्यांनी परिसर हादरला

अपघातानंतर बसमध्ये लागलेल्या आगीतून स्वतःचा जीव वाचवताना प्रवाशांना काय यातना सहन कराव्या लागल्या असतील, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी

प्रवासी साखर झोपेत, डिझेल टँक फुटून आगडोंब! काळीज चिरणाऱ्या किंकाळ्यांनी परिसर हादरला
धक्कादायक घटना...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 12:24 PM

चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक : यवतमाळच्या (Yavatmal Bus accident) पुसदहून मुंबईच्या दिशेने चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या (Chintamani Travels) बसने प्रवासी मुंबईच्या दिशेने निघाले. ही बस नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ आली आणि तिचा अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणारी लक्झरी आणि औरंगाबादच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक यांच्यात अपघात (Nashik Bus Accident) घडला. अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर बसला आग लागली. आगीचा भडका क्षणात संपूर्ण बसच्या भोवती पसरला. संपूर्ण बसला आगीने आपल्या कवेत घेतलं आणि प्रवाशांना जीव वाचण्यासाठी संधीही मिळाली नाही.

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसमधील मुंबईला जायला निघालेले प्रवासी साखर झोपेत होते. वेळ पहाटे पावण पाच-पाच वाजताची होती. अपघातानंतर बसलेल्या दणक्याने सर्व प्रवाशांचे डोळे उघडले. बसचा अपघात झालाय, हे कळेपर्यंत बसने पेट घेतला होता. बघता बघता बसच्या आतला भाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरु झाली. अवघ्या काही क्षणात आगीच्या धुमश्चक्रीत प्रवासी होरपळले. 10 जण जिवंत होरपळले. सहप्रवासी जळत असल्याचं पाहून इतर प्रवाशांचाही थरकाप उडाला. धक्कादायक बाब म्हणजे पेट घेतलेले काही प्रवासी हे रस्त्यावरही पडले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय.

अपघातानंतर झालेला गोंधळ, अपघातानंतर जळत असलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या, आगीच्या ज्वाळांच्या कचाट्यात सापडलेली बस, हे थरकाप उडवणारं दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शीही धास्तावून गेले होते. आगीचे लोट बसच्या बाहेरपर्यंत फेकले जात होते. त्यामुळे मदत करायची म्हटलं, तरी बसच्या जवळ जाणं अनेकांना धोकादायक वाटलं.

दरम्यान, अपघातग्रस्त चिंतावणी ट्रॅव्हल्सच्या या बसमध्ये कोण कोण प्रवासी जिवंत होरपळले, याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सकाळी 6.30 वाजेपर्यंत ही बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. काळजाचा थरकाप उडवणारी या अपघाताची भीषण दृश्यंही समोर आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या अपघातामध्ये बसचा चालक ब्रम्हा मनवर याचाही मृत्यू झालाय. ब्रम्हा हा दिग्रस येथे राहणार होता. इतर मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. आगीत जळाल्यानं मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचणींचा सामना करावा लागतोय.

बस अपघातातील जखमींची नावे

  • १. अमित कुमार – वय ३४
  • २. सचिन जाधव – वय ३०
  • ३. आश्विनी जाधव – वय २६
  • ४. अंबादास वाघमारे – वय ४३
  • ५. राजू रघुनाथ जाधव – वय ३३
  • ६. निलेश प्रेमसिंग राठोड – वय ३०
  • ७. भगवान श्रीपत मनोहर – वय ६५
  • ८. संतोष राठोड – वय २८
  • ९. हंसराज बागुल – वय ४६
  • १०. डॉ. गजकुमार बाबुलाल शहा – वय ७९
  • ११. त्रिशिला शहा – वय ७५
  • १२. भगवान लक्ष्मण भिसे – वय ५५
  • १३. रिहाना पठाण – वय ४५
  • १४. ज्ञानदेव राठोड – वय ३८
  • १५. निकिता राठोड – वय ३५
  • १६. अजय देवगण – वय ३३
  • १७. प्रभादेवी जाधव – वय ५५
  • १८. गणेश लांडगे – वय १९
  • १९. पूजा गायकवाड – वय २७
  • २०. आर्यन गायकवाड – वय ८
  • २१. इस्माईल शेख – वय ४५
  • २२. जयनुबी पठाण – वय ६०
  • २३. पायल शिंदे – वय ९
  • २४. चेतन मधुकर
  • २५. महादेव मारुती
  • २६. मालू चव्हाण – वय २२
  • २७. अनिल चव्हाण – वय २८
  • २८. दीपक शेंडे – वय ४०

10 ते 12 जणांचा मृत्यू आगीत होरपळून झालाय. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. गाडीतील अन्य सामान आणि प्रवाशांची माहिती घेत, आता प्रशासनाकडून बचावकार्य केलं जातंय. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांच्या नातलगांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आलीय. तसंच या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जातेय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.