Video : नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट! गळ्यात चैन घालून घरातच मिरवा, घराबाहेर चोरांची दहशत
Nashik Chain Starching News : दोन सीसीटीव्ही फुटेजमधून सोनसाखळी चोरांची मोड्स ऑपरेंडीही समोर आली आहे.
नाशिक : सोनसाखळी चोरांनी नाशकात (Nashik Crime) धुमाकूळ घातलाय. सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना याआधीही समोर आलेल्या आहेत. आता तर दोन सीसीटीव्ही फुटेज चैन स्नॅचिंगचे (Nashik Chain Snatching News) समोर आले असून सोनसाखळी चोरांची दहशत संपूर्ण नाशिक शहरात (Nashik City News) पाहायला मिळतेय. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांनी लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. चैन स्नॅचिंगच्या ज्या दोन घटना समोर आल्या आहेत, त्या घटनांनी नाशिकमध्ये खळबळ उडवली आहे. आता नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. त्यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखळ करुन घेत पथकंही रवाना केली आहे. दोन सीसीटीव्ही फुटेजमधून सोनसाखळी चोरांची मोड्स ऑपरेंडीही समोर आली आहे. दोन्ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाईकवरुन आलेल्या चोरांनी महिलांच्या गळ्यात चैनवर हात साफ केलाय.
पहिल्या सीसीव्हीमध्ये काय?
समोर आलेल्या पहिल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुणी रस्त्यावरुन चालताना दिसते. तिच्या पाठीवर एक बॅग असलेल्याचंही दिसतं. रस्त्याच्या कडेनं चालणाऱ्या या मुलीवर अचानक हात टाकला जातो. एक जण बाईकवरुन येतो आणि या मुलीच्या गळ्यातील चैनवर हा मारतो. जोरात गळ्यातली चैन खेचून हा तरुणी पटदिशी फरार होता. मुलीला काही कळायच्या आत बाईकवरुन हा तरुणा पसार झाल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय.
दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये काय?
तर दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोघेजण दुचाकीवरुन येताना दिसलेत. ते एका गेटपाशी थांबतात. यात दुचाकीवर मागे बसलेला तरुण खाली उतरतो. एका व्यक्तीसोबत तो बोलताना दिसतो. या व्यक्तीला काहीतरी विचारणा करत हा तरुण तिला बोलण्याच्या नादात गुंतवून ठेवतो. दरम्यान, ही व्यक्ती मागे बघताच चोरटा तिच्या गळ्यातील चैनवर हात मारतो. गळ्यातील चैन हिसकावून पळ काढणारे दोघेजण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत.
पाहा व्हिडीओ :
चोरट्यांना पकडण्याचं आव्हान
आता या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. नाशिक पोलीस सध्या या सोनसाखळी चोरट्यांच्या मागावर आहेत. चैन स्नॅचिंग करणाऱ्यांमध्ये इराणी गँग चा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याअनुशंगानं सध्या पोलीस तपासही करत आहेत. दरम्यान, हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीननं पोलिसांनी या चोरांना पकडण्यासाठी पथकं तैनात केली आहे. आता या चोरट्यांच्या मुसक्या पोलीस कशी आवळतात, याकडे संपूर्ण नाशिक शहरातील लोकांची नजर लागली आहे.