दारु पिऊन महिलेचा बसमध्ये धिंगाणा! तर्राट महिलेची पोलिसांनाही शिविगाळ, व्हिडीओही समोर
दारु प्यायलेल्या या महिलेनं आधी गाडीतल्या वाहकाला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर प्रवाशांनाही या महिलेनं शिव्या दिली. दरम्यान, या बसमधील काही प्रवाशांनी या महिलेचा धिंगाणा घातलानाचा व्हिडीओही रेकॉर्ड केला.
दाऊ पिऊन एसटी बसमध्ये (St Bus) चढलेल्या महिलेनं धिंगाणा घातला. ही घटना इगतपुरी (Igatpuri) इथं घडली. रात्रीच्या वेळी एसटी बसमधून प्रवास करताना एसटी बसच्या वाहकाला आणि चालकाला या महिलेने शिविगाळ करत त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. अखेर एसटी बस चालकाने धिंगाणा घालणाऱ्या महिलेला पोलिसांच्या हवाले केलं. पण त्यानंतरही या महिलेची नशा काही उतरली नव्हती. पोलिसांनाही या महिलेनं अर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ (foul language) केली. महिला पोलिसांच्या मदतीने धिंगाणा घालणाऱ्या या महिलेला पोलिसांनी जाबही विचारला. पण त्यांनाही महिलेनं उडवाउडवीची उत्तरं दिली. दारु पिऊन तर्राट असलेल्या या महिलेला कशाचीच शुद्ध नव्हती. या महिलेचा एसटी बसमधील धिंगाणा घालतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. तसंच पोलीस स्थानकातही महिलेनं केलेली शिविगाळ कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. या तर्राट महिलेमुळे पोलीस स्थानकात मोठा गोंधळ उडाला होता.
व्हिडीओही समोर
घोटी बस स्थानकातून शेणीत पेहिरीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये सदर घटना घडली. दारु प्यायलेल्या या महिलेनं आधी गाडीतल्या वाहकाला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर प्रवाशांनाही या महिलेनं शिव्या दिल्या. दरम्यान, या बसमधील काही प्रवाशांनी या महिलेचा धिंगाणा घातलानाचा व्हिडीओही रेकॉर्ड केला.
महिलेचा धिंगाणा पाहून एसटी बसच्या चालकाने बस थेट घोटी पोलीस स्थानकामध्ये आणली आणि या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर ही महिला भानावर येण्याऐवजी अधिकच संतापली आणि गोंधळ घालू लागली. पोलिसांनी या महिलेला अखेर जाब विचरण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेनं पोलिसांनाही शिविगाळ करण्यास सुरुवात केली.
सदर महिला ही आदिवासी समाजातील मुलांबाबत बोलताना व्हिडीओत दिसून आली आहे. तसंच मी कुणालाच मारहाण केली नसल्याचंही ती पोलिसांना म्हणाली. एका महिला पोलिसाने तर्राट महिलेचे दोन्ही हात पकडून तिची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ही तर्राट महिला रडकुंडीला आली होती. यावेळी घोटी पोलीस स्थानकात मोठा गोंधळ उडालेला होता.