Video : बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला! नाशिकमधील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

Nashik Leopard attack : बिबट्यापासून स्वतःला वाचवण्यासाठीची कुत्र्याची धडपड आणि बिबट्यासोबत झालेल्या झटापटीचा थरारही यावेळी पाहायला मिळालाय.

Video : बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला! नाशिकमधील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
नाशिकमध्ये बिबट्याचा हल्लाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 7:00 AM

नाशिक : नाशिकमध्ये मानवी वस्तीत बिबट्या (Nashik Leopard Attack)  घुसण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली. नाशिकच्या (Nashik Leopard News) एका गावात बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला. एका घराच्या अंगणामध्ये हा कुत्रा राखण करत होता. त्या वेळी कुणी तरी येतंय, याचा सुगावाही या कुत्र्याला लागला. त्यानंतर कुत्र्यानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावही घेतली. बिबट्यापासून बचाव करण्यासाठी कुत्रा सैरावैरा पळू लागला. पण बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली आणि त्याला जबड्यात पकडून बिबट्या पसारही झाला. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही (Nashik Leopard attack video) कैद झआली आहे. मानवी वस्तीत घुसून बिबट्यानं कुत्र्याला पळवून नेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालंय. रविवारी ही घटना घडली.

नेमकी कुठं घडली घटना?

नाशिक जिल्ह्यातील मुंगसरे गावात ही थरारक घटना घडली. यावेळी घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा हल्ला कैद झाला आहे. पाच जून रोजी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये एक कुत्रा अंगणात बसल्याचं दिसतं. हा पाळलेला कुत्रा असून त्याच्या गळ्यात एक पट्टाही दिसतो. कुणीतरी येत असल्याची जाणीव होताच कुत्रा सतर्क होतो. उठून उभा राहतो. बिबट्या असल्याचं लक्षात येताच, कुत्रा आधीच बचावासाठी प्रयत्न करतो. बिबट्यापासून स्वतःला वाचवण्यासाठीची कुत्र्याची धडपड आणि बिबट्यासोबत झालेल्या झटापटीचा थरारही यावेळी पाहायला मिळालाय.

पाहा व्हिडीओ :

बिबट्याची दहशत

नाशिकच्या अनेक गावांत बिबट्याची दहशत कायम आहे. रात्रीच्या वेळेस बिबट्याचे हल्ले वाढले असून लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहनही केलं जातंय. दरम्यान, रात्रीच्या वेळेस शक्यतो घरातून बाहेर पडू नये आणि खबरदारी बाळगावी, असं उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी म्हटलंय. वाढत्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सातत्यानं नाशिकच्या मानवी वस्तीमध्ये बिबटे दिसून आले आहेत. भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत घुसल्याच्या घटना वाढल्यानं चिंताही व्यक्त केली जातेय. याआधी नाशिकमध्ये बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला होता. नागरिकांवरही बिबट्यानं हल्ल्याच्या घटनांची नोंद याआधी करण्यात आलेली आहे. तर एप्रिल महिन्यात मामाच्या गावी राहायला आलेल्या एका सहा वर्षांच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या वाढत्या घटनांमुळे बिबट्याचा बंदोबस्त केला जावा, अशी मागणी जोर धरतेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.