कसारा घाटात कंटेनरचा थरारक अपघात! 50 फूट खोल दरीत कोसळला आणि चालक…

50 फूट खोली दरीत कोसळतानाचा थरार, चालक आतच, कंटेनर हवेत! पुढे जे घडलं ते काळजाचा ठोका चुकवणारं होतं.

कसारा घाटात कंटेनरचा थरारक अपघात! 50 फूट खोल दरीत कोसळला आणि चालक...
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 10:49 AM

इगतपुरी : नाशिक मुंबई (Nashik Mumbai Accident) हायवेवरील नवीन कसारा घाटात (Kasara Ghat Accident) कंटेनरचा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल गेल्यानं एक कंटेनर घाटातील संरक्षक कठडा तोडून थेट 50 फूट खोल दरीत कोसळला. धक्कादायक बाब म्हणजे दरीत कोसळतानाही चालकाने कंटेनर सोडला नाही. चालक कंटेनरच्या आतच अडकला होता. दरीत कोसळल्यानंतर चालकही अपघातग्रस्त कंटेनरच्या खालीच अडकला गेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काळजाचा ठोका चुकणाऱ्या या भीषण अपघातातून (Nashik Accident News) जखमी चालक आश्चर्यकारकरीत्या बचावलाय. तब्बल एका तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर कंटेरनच्या आत अकडलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आलंय.

नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट जवळ सिमेंट पेव्हर ब्लॉकने भरलेल्या कंटेनरचा भीषण अपघात झाला. या कंटेनरचा क्रमांक MH 49 HF 1513 असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात घडला.

कंटेनरचे आधी संरक्षक भिंतीला धडक दिली. संरक्षक भिंतीला तोडून कंटेनर थेट 50 फूट खोल दरीत जाऊन कोसळला होता. यावेळी कंटेनरचा चालक हा चक्क कंटेनरच्या खाली अडकला गेला होता. पण त्याला बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग सापडत नव्हता.

हे सुद्धा वाचा

कंटेनरच्या अपघाताची माहिती मिळताक्षणी बचाव यंत्रणानी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस केंद्र, घोटी, आपत्ती व्यवस्थापन टीप आणि रुट पेट्रोलिंग टीमच्याा साहाय्याने बचावकार्य करण्यात आलं. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनी चालकाला बाहेर काढण्यात यश आलं.

क्रेनच्या मदतीने यावेळी बचाव यंत्रणांनी चालकाला बाहेर काढलं. भीषण अपघातातून थोडक्यात बचावलेल्या चालकानेही कंटेनरच्या बाहेर आल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. अपघातात चालक जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात चालकाला सध्या दाखल करण्यात आले आहेत.

या अपघातात कंटेनरची चारही चाकं वर आली होती. कंटेनरचा अक्षरशः चक्काचूर झाला. तर कंटेनरमधील सिमेंटचे ब्लॉक बाहेर पडून मोठं आर्थिक नुकसान झालंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.