Nashik Crime : अरबी भाषेत मंत्र लिहून तरुणीचा फोटो झाडाला लटकवला, नाशिकमध्ये अघोरी विद्येचा प्रयत्न
पुरोगामी महाराष्ट्रात अघोरी प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार पाहून नागरिक हैराण झाले आहेत. दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
नाशिक / 31 ऑगस्ट 2023 : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीच्या फोटोवर अरबी भाषेत मंत्र लिहून अघोरी विद्येचा प्रयत्न केल्याचं येवला शहरात उघडकीस आलं आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी ही बाब पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. नागरिकांनी तात्काळा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे याबाबत तक्रार देण्यात दिली. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाली. याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे येवला शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. हा प्रकार कुणी केला?, कोणत्या उद्देशाने केला? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
काय आहे प्रकरण?
येवला शहरातील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी लिंबाच्या झाडाला एका तरुणीचा फोटो लावून, अरबी भाषेतील चिठ्ठीमध्ये मंत्र लिहिलेले साहित्य परिसरातील नागरिकांना आढळून आले होते. यानंतर परिसरात खळबळ उडाली. कुणीतरी जादूटोणा करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला होता. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे अंश्रश्रद्धा निर्मूलन समितीसा हा प्रकार कळला. येवला शहर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तपासाअंतीच हा प्रकार कुणी केला हे उघड होईल.